आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 29,413 नवे प्रकरणे, 125 दिवसातील हा सर्वात कमी आकडा; सक्रिय रुग्णांचा आकडादेखील 4 लाखांपेक्षा कमी

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 3 लाख 99 हजार 998 लोकांवर उपचार सुरू आहे.

कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेच्या पार्श्वभूमीवर देशातून एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. गेल्या 24 तासात देशात 29 हजार 413 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 45 हजार 345 लोक उपचार घेत बरे झाले आहे. तर यामध्ये 372 लोकांचा कोरोनामूळे मृत्यू झाला आहे.

नवीन कोरोनाबाधितांचा हा आकडा गेल्या 125 दिवसांत सर्वात कमी आहे. यापूर्वी 16 मार्च रोजी 28 हजार 869 लोक पॉझिटिव्ह आढळले होते. मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासातील मृतांचा आकडा हा 111 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 355 लोकांचा मृत्यू झाला होता.

सक्रिय रुग्णसंख्येत घट
देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतदेखील दिवसेंदिवस घट होत आहे. गेल्या 24 तासात या आकडेवारीत 16 हजार 322 ने घट झाल्याचे पाहायला मिळाले आहे. देशात सध्या 3 लाख 99 हजार 998 लोकांवर उपचार सुरू आहे. हा आकडा गेल्या 117 दिवसातील सर्वात कमी आकडा आहे. यापूर्वी 24 मार्च रोजी 3 लाख 91 हजार सक्रिय रुग्ण होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 29,413
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 45,345
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 372
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.11 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3.03 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.14 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेले रुग्ण : 4.16 लाख
बातम्या आणखी आहेत...