आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 आढळले 41,683 नवे प्रकरणे, 38,793 बरे तर 510 लोकांचा मृत्यू; केरळ राज्यात कोरोनाच्या नवीन संक्रमितांमध्ये वाढ

नवी दिल्ली4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.03 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे बुधवारी देशात 41 हजार 683 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, यात 38 हजार 793 लोक उपचार घेत बरे झाले तर कोरोनामुळे 510 लोकांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीतदेखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. बुधवारी सक्रिय रुग्णांमध्ये 2 हजार 374 ने वाढ झाली.

देशात एकीकडे काही राज्यातील कोरोनाचा प्रार्दुभाव कमी होत आहे. पण दुसरीकडे, केरळ राज्यात दररोज नवीन संक्रमितांमध्ये वाढ होत असल्याने परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. येथे गेल्या 24 तासात 17,481 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. हा आकडा गेल्या दीड महिन्यातील सर्वात जास्त आहे. यापूर्वी 3 जून रोजी 18 हजार 853 लोक पॉझिटिव्ह आढळले होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 41,683
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 38,793
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 510
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.12 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.04 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.19 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.03 लाख
बातम्या आणखी आहेत...