आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​​​​​​​कोरोना देशात:मागील 24 तासात आढळले 38,176 नवे प्रकरणे, 35,945 बरे तर 411 लोकांचा मृत्यू; 11 राज्यात दररोज 500 पेक्षा जास्त रुग्ण

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.04 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशातील कोरोना प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी जास्त होत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी देशात 38 हजार 176 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 35 हजार 945 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 411 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 2 हजार 112 ने वाढ झाली आहे.

तर दुसरीकडे, चिंतेची बाब म्हणजे देशातील 11 राज्यात दररोज 500 पेक्षा जास्त कोरोनाबाधीत आढळत आहेत. यामध्ये महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, आसाम, मणिपूर, मेघालय आणि मिझोरम राज्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 38,176
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 35,945
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 411
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.14 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.05 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.20 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 4.04 लाख
बातम्या आणखी आहेत...