आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 48,618 नवीन प्रकरणे, 64,524 बरे तर 1,182 मृत्यू; 10 राज्यांत संसर्गाचा दर 5% पेक्षा जास्त

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 5.90 लाख लोकांवर सध्या उपचार सुरु आहे

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 48 हजार 618 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, यामध्ये 64 हजार 524 लोक उपचार घेत बरे झाले तर 1 हजार 182 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या कमी होणाऱ्या प्रकरणासोबत सक्रिय रुग्णांचा आकडादेखील कमी होत आहे. गेल्या चोवीस तासात सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 17 हजार 101 ने घट झाली.

देशातील काही राज्यांत एकीकडे कोरोनाचे रुग्ण कमी होत आहे. तर दुसरीकडे देशातील 10 राज्यांत संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. चिंतेच बाब म्हणजे येथे प्रत्येक 100 चाचणी मागे 5 पेक्षा जास्त रुग्ण पॉझिटिव्ह आढळत आहे. यामध्ये सिक्कीम, मणिपूर, मेघालय, मिझोरम, केरळ, नागालँड, गोवा, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि अरुणाचल प्रदेश राज्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 48,618
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 64,524
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,182
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.01 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.91 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.94 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 5.90 लाख
बातम्या आणखी आहेत...