आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:मागील 24 तासांत आढळले 42,966 नवे प्रकरणे, 41, 491 बरे तर 641 लोकांचा मृत्यू; केरळमध्ये नवीन संक्रमितांच्या आकड्यात वाढ

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 3.93 लाख लोक उपचार घेत आहे

देशात कोरोनाचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 42 हजार 966 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 41 हजार 491 लोक उपचार घेत बरे झाले तर 641 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे, केरळ राज्यातदेखील नवीन संक्रमितांमध्ये दिवसेंदिवसे वाढ होत आहे. राज्यात येथे मंगळवारी 22 हजार 129 कोरोना पॉझिटिव्ह आले. हा आकडा गेल्या 2 महिन्यात सर्वात जास्त आहे. यापूर्वी 29 मे रोजी 23 हजार 513 लोक कोरोनाबाधीत झाले होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण रुग्ण : 42,966
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 41,491
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 641
  • आतपर्यंत एकूण संक्रमित झालेले रुग्ण : 3.14 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण 3.06 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.22 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.93 लाख
बातम्या आणखी आहेत...