आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 44,667 नवे रुग्ण, 42,107 बरे झाले; केरळमध्ये सलग तिसऱ्या 50 टक्के नवीन प्रकरणे

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 दिवसातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे.

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. देशात गेल्या 24 तासात 44 हजार 667 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, 42 हजार 107 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 549 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नवीन संक्रमितांचा हा आकडा गेल्या 24 दिवसातील सर्वात जास्त असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 7 जुलै रोजी 45 हजार 701 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण रुग्ण : 44,667
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 42,107
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 549
  • आतपर्यंत एकूण संक्रमित झालेले रुग्ण : 3.15 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण 3.07 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.23 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 3.99 लाख
बातम्या आणखी आहेत...