आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 42,797 नवे रुग्ण, 41,869 बरे तर 532 लोकांचा मृत्यू; सर्वात जास्त 195 मृत्यू महाराष्ट्रात

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सध्या देशात 4.04 लाख लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. गेल्या 24 तासात 42 हजार 797 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 41 हजार 869 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 532 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

यापूर्वी सोमवारी 30 हजार 85 तर मंगळवारी 42 हजार 530 कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. देशात केरळ राज्यात सर्वात जास्त कोरोनाचे नवीन प्रकरणे समारे येत आहे. येथे एका दिवसात 22 हजार 414 लोक कोरोनाबाधित झाले आहे. यामध्ये 108 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 42,797
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 41,869
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 532
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.18 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.09 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.26 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4.04 लाख
बातम्या आणखी आहेत...