आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसांत आढळले 40,111 नवे प्रकरणे, 42,322 बरे तर 725 मृत्यू; गेल्या दिवसात 19 राज्यांमध्ये 10 पेक्षा कमी मृत्यू

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4.77 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशात कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रार्दुभाव आता हळूहळू कमी होत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी देशात 40 हजार 111 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, रविवारी देशात 42 हजार 322 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 725 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात गेल्या 88 दिवसांत मृत्यूचा आकडा हा सर्वात कमी आलेला आहे.

दिलासादायक बातमी म्हणजे गेल्या दिवसांत 19 राज्यांमध्ये 10 पेक्षा कमी मृत्यू झाले आहे. तर दुसरीकडे देशातील सात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांत कोरोनामुळे एकही मृत्यू झाले नसल्याचे समोर आले आहे.

या राज्यांत 10 पेक्षा कमी मृत्यू
देशातील या राज्यांत कोरोनामुळे 10 पेक्षा कमी मृत्यू झाले आहे. यामध्ये दिल्ली, छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश, बिहार, तेलंगणा, पंजाब, झारखंड, उत्तराखंड, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, गोवा, पुडुचेरी, मणिपूर, त्रिपुरा, मेघालय, अरुणाचल प्रदेश या राज्यांचा समावेश आहे.

या राज्यांत एकही मृत्यू नाही
चंदीगड, नागालँड, मिझोरम, सिक्कीम, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव, लक्षद्वीप आणि अंदमान आणि निकोबार या राज्यांत एकही मृत्यू झाले नाही.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 40,111
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 42,322
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 725
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.05 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.96 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.02 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.77 लाख
बातम्या आणखी आहेत...