आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:एका दिवसात आढळले 45,000 नवे प्रकरणे, हे 29 दिवसातील सर्वात जास्त; महाराष्ट्रात 16 दिवसांनंतर नवीन प्रकरणात पुन्हा वाढ

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील 49 कोटी लोकांचे लसीकरण

देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात पुन्हा एकदा वाढ होत आहे. गेल्या काही दिवसापासून देशात 40 हजारांपेक्षा जास्त कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गुरुवारी देशात 45,001 नवे रुग्ण आढळून आले असून हा आकडा 7 जुलैनंतरचा सर्वाधिक आहे. यावेळी 45 हजार 701 कोरोना पॉझिटिव्ह आले होते. गेल्या 24 तासात देशात 40 हजार 897 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 465 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात नवीन प्रकरणात वाढ
देशात सर्वात जास्त रुग्ण केरळ राज्यात आढळत आहे. त्यासोबतच महाराष्ट्र राज्यातही कोरोनाच्या नवीन प्रकरणात वाढ होत आहे. येथे गेल्या 24 तासात 9 हजार 26 रुग्ण आढळून आले असून यामध्ये 120 लोकांचा मृत्यू झाला आहे. यापूर्वी 20 जुलै रोजी 9 हजार 389 रुग्ण आढळले होते.

देशातील 49 कोटी लोकांचे लसीकरण
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात आतापर्यंत 49 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. गुरुवारी 50.29 लाख लोकांनी लस घेतली. दरम्यान, 18 ते 44 वर्षांच्या 16.92 लाख लोकांनी पहिला डोस तर 1.07 लोकांनी दुसरा डोस घेतला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 45,001
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 40,897
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 465
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.18 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 3.10 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.26 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची एकूण संख्या : 4.08 लाख
बातम्या आणखी आहेत...