आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 34,026 नवे रुग्ण, 51,827 बरे तर 552 मृत्यू, नवीन संक्रमितांचा आकडा 106 दिवसांत सर्वात कमी

नवी दिल्ली18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 5 लाख 58 हजार लोकांवर उपचार सुरु आहे

देशात सोमवारी 34 हजार 26 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. यामध्ये 51 हजार 827 लोक उपचार घेत बरे झाले तर 552 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे देशातील कोरोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या दिवसातील कोरोनाची आकडेवारी 106 दिवसातील सर्वात कमी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 16 मार्च रोजी 28 हजार 869 नवे रुग्ण आढळले होते.

कोरोनाच्या नवीन रुग्णांसोबत मृतांचा आकडादेखील दिवसेंदिवस कमी होत आहे. सोमवारी कोरोनामुळे झालेल्या मृतांचा आकडा गेल्या 3 महिन्यांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी 3 एप्रिल रोजी 514 लोकांचा मृत्यू झाला होता.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 34,026
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 51,827
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 552
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.06 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.97 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.03 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.58 लाख
बातम्या आणखी आहेत...