आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India: 87 Per Cent Decrease In The Number Of Patients Found Daily In The Country; News And Live Updates

दिलासा:87 टक्क्यांनी घटले देशात दररोज आढळणारे रुग्ण; नवे रुग्ण आता 50 हजार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • यूपी-बिहारसह 11 मोठ्या राज्यांत नवे रुग्ण 300 हून कमी

कोरोना संसर्ग थांबण्याची सुखद मालिका सुरू आहे. देशात रविवारी ५०,९११ नवे रुग्ण आढळले. ते ४ लाखांच्या उच्च पातळीहून ८७% कमी आहेत. ही पातळी ५ एप्रिल, म्हणजे ७७ दिवसांनी आली. महत्त्वाचे म्हणजे रविवारी फक्त तामिळनाडू, कर्नाटक, आंध्र आणि महाराष्ट्रात ५ हजारहून अधिक रुग्ण आढळले, तर दुसरीकडे मोठ्या लोकसंख्येच्या यूपी, बिहारसह ११ राज्यांत ३०० हून कमी रुग्ण आढळले. रविवारी देशात संसर्गाचा दरही (टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट) ३% च्या जवळ पोहोचला. एक महिन्यापूर्वी १७ मे रोजी तो १५%हून अधिक होता.

म्हणजे, तेव्हा दर १०० चाचण्यांत १५ हून अधिक रुग्ण आढळत. आता फक्त ३ आढळताहेत. कोरोनाविरुद्धच्या युद्धात सोमवारी मध्य प्रदेश, हरियाणासह काही राज्यांत “मेगा व्हॅक्सिनेशन डे’ साजरा होईल. मध्य प्रदेशात सोमवारी १० लाख डोसचे लक्ष्य आहे. आंध्र प्रदेशने रविवारीच १३ लाख डोस देऊन मेगा व्हॅक्सिनेशन डे साजरा केला. केंद्र सरकारनुसार, राज्यांकडे सध्या ६.३५ कोटी डोस शिल्लक आहेत. मंगळवारपर्यंत २५ लाख डोस आणखी मिळतील. पुढील महिन्यात जुलैमध्ये देशात लसींचे १७ कोटी डोस तयार होतील.

दिलासा ४ गोष्टींचा यूपी-बिहारसह ११ मोठ्या राज्यांत नवे रुग्ण ३०० हून कमी
1. भारत आता सर्वाधिक रुग्णसंख्येचा देश नाही

भारतात गेल्या ७ दिवसांत ४.४२ लाख रुग्ण. ब्राझीलमध्ये सर्वाधिक ५.०७ लाख.
2. ज्या गतीने रुग्णवाढ त्याच गतीने घट
रोजचे रुग्ण ५० हजारांहून ४ लाख होण्यास ३७ दिवस. ४ लाखांचे ५० हजार होण्यास ४५ दिवस.
3. संसर्गाचा फैलाव एका भागातच मर्यादित
रविवारी ३८,९९० (७७%) रुग्ण फक्त तामिळनाडू, कर्नाटक, केरळ, आंध्र, महाराष्ट्रात.
4. १०० मध्ये ३ रुग्ण, १ महिन्यापूर्वी १५
संसर्गाचा दर ५ पट घटला, यूपी-बिहारसह १० मोठ्या राज्यांत दर १%च्या जवळ पोहोचला आहे.

या राज्यांत रुग्ण घटल्याने देशाला थोडा दिलासा
१४ दिवसांत घसरण
मध्य प्रदेश-84.7%
राजस्थान-84.5%
उत्तर प्रदेश-81.9%
हरियाणा-80.4%
गुजरात-79.2%

येथे वेगाने घसरण झाली तर आकडा 30 हजारांवर
१४ दिवसांत घसरण
केरळ-41.5%
तेलंगण-42.5%
आंध्र-44.5%
महाराष्ट्र-45.5%
ओडिशा-50.1%

थोडी चिंताही...मृत्यूंत आतापर्यंत ६४%च घट
रविवारी १,४१३ मृत्यू झाले. हा आकडा सर्वोच्च स्तरापेक्षा ६४%नी घटला आहे. तज्ज्ञांच्या मते, रुग्ण वाढले नाहीत तर पुढील आठवड्यात मृत्यूचा आकडा १ हजारपर्यंत येईल.

अमेरिकेने लसीद्वारे रोखली संसर्गाची लाट, अाता आपली वेळ
अमेरिकेच्या शहरांत ७०% पेक्षा जास्त लोकसंख्येला लस दिली आहे. त्यामुळे संसर्ग थांबला, असे वैज्ञानिक सांगतात. अशाच प्रकारे भारतात तिसरी लाट रोखण्यास लसच महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

बातम्या आणखी आहेत...