आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India, Corona Cases And Deaths In India Latest News And Updates 23 November 2020

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:भारतात या महिन्यात 1 ते 20 तारखेपर्यंत कोरोनाचे 1.21 लाख सक्रिय रुग्ण घटले, मात्र आता पुन्हा वाढताहेत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिलासा : सर्वाधिक सक्रिय रुग्णांच्या महाराष्ट्र-केरळात घट
  • चिंता : राजस्थान, हरियाणा, यूपी व दिल्लीत आता वाढताहेत रुग्ण

देशात सक्रिय रुग्णांत दीड महिना घसरणीनंतर वाढ होऊ लागली आहे. गेल्या २ दिवसांत ३ हजार सक्रिय रुग्ण वाढले आहेत. म्हणजे जेवढे नवे रुग्ण आढळले त्यापैकी ३ हजार कमी रुग्ण बरे झाले. २ ते २० नोव्हेंबरपर्यंत १.२१ लाख सक्रिय रुग्ण घटले. विशेष म्हणजे महाराष्ट्र-केरळसह ज्या राज्यांत सक्रिय रुग्ण जास्त घटले तेथे घसरण सुरू आहे. मात्र, राजस्थान, हरियाणा, यूपी, दिल्लीत सक्रिय रुग्ण वाढू लागले आहेत.

देशात तयार होत असलेल्या लसीची चाचणी दोन महिन्यांत पूर्ण हाेणार : हर्षवर्धन

देशात तयार होत असलेल्या कोरोना लसीची अंतिम टप्प्याची चाचणी दोन महिन्यांत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असे प्रतिपादन केंद्रीय आरोग्यमंत्री डाॅ. हर्षवर्धन यांनी केले. आयसीएमआर व भारत बायोटेक एकत्रितपणे ही लस तयार करत आहेत. तिसऱ्या टप्प्यात २६ हजार स्वयंसेवकांवर तिची चाचणी केली जाणार आहे. एका वेबिनारमध्ये हर्षवर्धन यांनी पुढील वर्षी जुलैपर्यंत २० ते २५ कोटी लोकांचे लसीकरण करण्याची योजना आहे, याचा पुनरुच्चार केला. या महिन्याच्या सुरुवातीला आयसीएमआरच्या वैज्ञानिकाने म्हटले होते की, लस फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये लाँच केली जाऊ शकते. भारत बायोटेकने मात्र अंतिम टप्प्याच्या चाचणीचा निकाल मार्च-एप्रिलपर्यंत येईल, अशी अपेक्षा व्यक्त केली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser