आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India | Corona Virus Cases In India 20 May News And Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना:देशात फक्त 13 दिवसांत वाढले 50 हजार कोरोना रुग्ण, 4 राज्यांतच वाढले 74%

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • एका दिवसात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक 5402 रुग्ण

लॉकडाऊनमधील सवलती आणि देशातील बहुतेक भागात आर्थिक कारभार सुरू होण्याबरोबरच कोरोनाबाधितांची संख्या एक लाखावर पोहोचली आहे. पाच मे रोजी देशांत रुग्णांची संख्या सुमारे ५० लाख होती. त्यानंतर १३ दिवसांत ५० हजार रुग्ण वाढले. या ५० हजार रुग्णांपैकी ३७,६८६ म्हणजे सुमारे ७४% रुग्ण दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र आणि तामिळनाडू या चार राज्यांतले आहेत. नवे १९,५३३ रुग्ण तर महाराष्ट्रातच आढळले. हे प्रमाण देशातील एकूण रुग्णांच्या सुमारे २०% आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू, दिल्ली आणि गुजरातमधील स्थिती चिंताजनक आहे. १३ दिवसांत या राज्यांतील रुग्णसंख्या १० हजारांवर पोहोचली आहे. देशभरात बळींची संख्या दुप्पट झाली आहे.

३७% रुग्ण या तीन शहरांतच आहेत

मुंबई, अहमदाबाद व चेन्नई ही देशातील तीन शहरे गंभीर संसर्गाने ग्रस्त आहेत. देशात एकूण रुग्णांपैकी ३७% रुग्ण या तीन शहरांतच आहेत. मुंबईत २१,१५२, अहमदाबादेत ८,६८३ आणि चेन्नईत ७,११७ रुग्ण आहेत. रुग्ण वाढण्याचे प्रमाणही येथे सर्वात जास्त आहे.

एका दिवसात आढळले आतापर्यंतचे सर्वाधिक 5402 रुग्ण

देशात मंगळवारी सर्वाधिक ५,४०२ कोरोना रुग्ण आढळले. त्याचबरोबर रुग्णांची संख्या १,०५,४९८ झाली. ६७ रुग्णांच्या मृत्यूसह बळींची संख्याही ३,१४५ झाली. मंगळवारी महाराष्ट्रात २१२७ नवे रुग्ण आढळले. तेथे रुग्णांची संख्या ३७,१३६ झाली आहे. सर्वाधिक १४११ रुग्ण मंुंबईत आढळल्याने तेथील एकूण रुग्ण संख्या २२७४६ वर पोहोचली. तर गुजरातेत ३९५ नवे रुग्ण आढळले. तेथे एकूण १२,१४१ रुग्ण झाले आहेत. अहमदाबादेत २६२ नवे रुग्ण आढळल्याने तेथील रुग्ण संख्या ८,९४५ झाली. तामिळनाडूत ६८८, दिल्लीत ५००, राजस्थानात ३८२ आणि बिहारमध्ये १०३ नवे रुग्ण आढळले.

बातम्या आणखी आहेत...