आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India: Coronavirus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update, Corona (COVID 19) Death Toll India Today 15may, Mumbai Delhi Coronavirus News And Live Updates

कोरोनादरम्यान दिलासा देणार बातमी:देशात गेल्या 6 दिवसात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 5.6% घट; दैनंदिन प्रकरणातही 11% घट

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 24 तासांत 3,876 मृत्यू; 3.52 लाख लोक बरे झाले

देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचे नवीन रुग्ण मोठ्या संख्येने आढळत होते. परंतु, आता कोरोनादरम्यान देशातून दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. कोरोना महामारीचा वेग आता कमी होताना दिसत आहे. कारण गेल्या 6 दिवसापासून देशात पॉझिटिव्हिटी रेटमध्ये 5.6% ने घट झाली असून दैनंदिन प्रकरणेही 11 टक्क्यांनी कमी झाले आहे. 9 मे रोजी पॉझिटिव्हिटी रेट 24.9% होती. म्हणजेच प्रत्येक 100 चाचणींमागे 25 लोक कोरोनाबाधित आढळत होते. परंतु, 14 मे रोजी हा आकडा 19.3% वर आला. म्हणजेच आता प्रत्येक 100 चाचण्यांमध्ये 19 किंवा 20 लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळत आहे.

तर दुसरीकडे, देशातील नवीन येणार्‍या रुग्णसंख्येतही घट होताना दिसत आहे. कारण कोरोना महामारीच्या दैनंदिन प्रकरणात आता 11 टक्क्यांनी घट झाली आहे. देशात 9 मे रोजी 3.66 लाख लोक संक्रमित झाले होते. तर 14 मे रोजी ही संख्येत 40 हजाराने घट होत 3.26 लाखांवर आली आहे.

गेल्या 24 तासांत 3,876 मृत्यू; 3.52 लाख लोक बरे झाले
देशात गेल्या 24 तासांत 3 लाख 26 हजार 14 नवीन रुग्ण आढळले असून यामध्ये 3 हजार 876 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना महामारीदरम्यान, दिलासा देणारी बातमी ही की, एका दिवसात 3 लाख 25 हजार 850 लोक उपचार घेत बरे झाले. देशातील सक्रिय रुग्णदेखील झपाट्याने कमी असून शुक्रवारी यामध्ये 30 हजार 754 ने घट झाली आहे. यापूर्वी 10 मे रोजी सक्रिय रुग्णसंख्येत 30 हजार 490 घट झाली होती.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • मागील 24 तासात रुग्ण आढळले: 3.26 लाख
  • मागील 24 तासात झालेले मृत्यू: 3,876
  • मागील 24 तासात रुग्ण ठीक झाले: 3.52 लाख
  • आतापर्यंचे एकूण संक्रमित: 2.43 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.04 कोटी
  • आतापर्यंतचे एकूण मृत्यू: 2.66 लाख
  • सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या: 36.69 लाख
बातम्या आणखी आहेत...