आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona Virus Outbreak In India: In 24 Hours 46,498 Are Found, 28 June 2021; News And Live Updates

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 46,498 नवीन प्रकरणे, 58,540 बरे तर 978 मृत्यू; 76 दिवसात पहिल्यांदाच मृतांचा आकडा एक हजारांपेक्षा कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • देशात सध्या 5 लाख 68 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात गेल्या 24 तासांत 46 हजार 498 कोरोनाबाधीतांची नोंद झाली. दरम्यान, 58 हजार 540 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 978 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे मृतांचा हा आकडा गेल्या 76 दिवसांत एक हजारांपेक्षा कमी आला आहे. यापूर्वी 12 एप्रिल रोजी 880 लोकांचा कोरोनाने जीव घेतला होता.

उपचार घेणार्‍यांच्या आकडेवारीतही दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत म्हणजे रविवारी सक्र‍िय रुग्णांच्या संख्येत 13 हजार 34 ने घट झाली होती. देशात सध्या 5 लाख 68 हजार 48 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 46,498
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 58,540
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 978
 • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3.02 कोटी
 • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.93 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.96 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 5.68 लाख
बातम्या आणखी आहेत...