आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Corona Virus Outbreak In India: In 24 Hours 52,956 Patients Are Found In Country; News And Live Updates

कोरोना देशात:24 तासात 52,956 नवीन प्रकरणे, 77,967 बरे तर 1,423 मृत्यू; 78 दिवसांत सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 6.97 लाख

देशात कोरोना महामारीचा वाढता प्रार्दुभाव आता दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 52 हजार 956 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली. यामध्ये 77 हजार 967 लोक उपचार घेत बरे झाले तर 1 हजार 423 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी गेल्या 89 दिवसातील सर्वात कमी असल्याचे सांगितले जात आहे. यापूर्वी 23 मार्च रोजी 47 हजार 239 लोकांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता.

देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. एका दिवसांत सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीत 26 हजार 457 ने घट पाहायला मिळाली. गेल्या 78 दिवसात सक्रिय रुग्णांची संख्या 7 लाखांपेक्षा कमी आली आहे. सध्या देशात 6 लाख 97 हजार 893 लोकांवर उपचार सुरु आहेत. यापूर्वी 3 एप्रिल रोजी देशात 6 लाख 87 हजार 434 सक्रिय रुग्ण होते.

देशात कोरोना महामारीचे आकडे

 • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 52,956
 • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 77,967
 • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,423
 • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 2.99 कोटी
 • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.88 कोटी
 • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.88 लाख
 • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 6.97 लाख
बातम्या आणखी आहेत...