आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India, Novel Corona (COVID 19) Death Toll India Today News And Updates

देशात कोरोना:आतापर्यंत 6 हजार 637 प्रकरणे: केंद्राने 15 हजार कोटींच्या इमरजेंसी फंड मंजुरी दिली, औषधे, प्रयोगशाळा आणि मेडिकल उपकरणांवर होईल खर्च

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिल्ली : लॉकडाउनदरम्यान पोलिसांपासून वाचण्यासाठी लोक जीव धोक्यात घालून अशाप्रकारे भिंत ओलांडत आहेत. - Divya Marathi
दिल्ली : लॉकडाउनदरम्यान पोलिसांपासून वाचण्यासाठी लोक जीव धोक्यात घालून अशाप्रकारे भिंत ओलांडत आहेत.
  • हायड्रॉक्सीक्लोक्वीनवरील निर्यात बंदी उठवल्याबद्दल ट्रम्प यांनी मोदींचे मानले आभार

कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या देशभरात 6 हजार 637 झाली आहे. परिस्थितीशी सामना करण्यासाठी केंद्र सरकारने कोविड-19 इमरजेंसी रिस्पॉन्स अँड हेल्थ सिस्टीम प्रिपेयर्डनेस पॅकेज अंतर्गत 15 हजार कोटी रुपयांच्या फंडला मंजुरी दिली आहे. आरोग्य मंत्रालयाने सांगितले की. 100% केंद्रीय फंडच्या या पॅकेजला जानेवारी, 2020 ते मार्च 2024 दरम्यान तिन टप्प्यात लागू केले जाईल. देशभरात कोरोना व्हायरस संक्रमितांची संख्या 6 हजार 284 झाली आहे. आज 319 जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  यात महाराष्ट्रात 211, गुजरातमध्ये 76, राजस्थानात 47, उत्तरप्रदेशात 19, मध्यप्रदेशात 56 आणि बिहारमध्ये 12 रुग्णांची वाढ झाली. याशिवाय झारखंडमध्ये 9, पंजाबमध्ये 24, पश्चिम बंगालमध्ये 4, तर हिमाचल प्रदेश आणि छत्तसगडमध्ये 1-1 प्रकरणे समोर आली आहेत. ही आकडेवारी covid19india.org वेबसाइटनुसार आहे. तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, देशातील एकूण संक्रमितांची संख्या 5 हजार 734 झाली आहे. यातील 472 रुग्ण बरे झाले तर 166 लोकांचा मृत्यू झाला आहे.  सरकारने पत्रकार परिषदेत सांगितले की, रेल्वेने 2 हजार 500 डॉक्टर आणि 35 हजार पॅरामेडिकल कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. रेल्वेचे 586 आरोग्य युनिट, 45 उपविभागीय रुग्णालये, 56 विभागीय रुग्णालये, 8 उत्पादन युनिट आणि 16 झोनल हॉस्पिटल संक्रमण रोखण्यासाठी काम करत आहेत. 

हायड्रॉक्सीक्लोक्वीनवरील निर्यात बंदी उठवल्याबद्दल ट्रम्प यांनी मोदींचे आभार मानले
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोरोनाच्या उपचारात प्रभावी मानल्या जाणार्‍या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनवरील आंशिक निर्बंध हटविल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. ट्रम्प म्हणाले की, हे उपकार आम्ही कधीही विसरणार नाहीत. आपले मजबूत नेतृत्व केवळ भारतालाच नाही तर या आव्हानाशी लढणार्‍या मानवतेलाही मदत करेल.

बातम्या आणखी आहेत...