आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 42,751 नवे रुग्ण, 51,775 बरे तर 932 लोकांचा मृत्यू; सलग त‍िसर्‍या द‍िवशी नवीन प्रकरणांत घट

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4 लाख 80 हजार लोकांवर उपचार सुरु आहे.

देशात गेल्या 24 तासांत म्हणजे शनिवारी 42 हजार 751 नवीन कोरोनाबाध‍ितांची नोंद करण्यात आली आहे. यात 51 हजार 775 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 932 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यासोबतच देशातील सक्र‍िय रुग्णांच्या संख्येतदेखील द‍िवसेंद‍िवस घट होत आहे. देशात शनिवारी उपचार घेणार्‍यांच्या संख्येत 9 हजार 986 ने घट झाली. त्यामुळे देशातील सक्रिय रुग्णांचा आकडा 5 लाखांपेक्षा खाली आला आहे. तर दुसरीकडे नवीन प्रकरणांत सलग त‍िसर्‍या द‍िवशी घट पाहायला म‍िळाली आहे.

देशात बुधवारी 48,606 नवीन प्रकरणे आढळले होते. त्यानंतर गुरुवारी 46,781 तर शुक्रवारी 44,185 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. देशात सध्या 4 लाख 80 हजार लोकांवर उपचार सुरु आहे. नवीन रुग्णांचा आकडादेखील 9 द‍िवसांत 50 हजारांपेक्षा कमी आला आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 42,751
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 51,775
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 932
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.05 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.96 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.02 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.80 लाख
बातम्या आणखी आहेत...