आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशात कोरोना महामारी विक्राळ होत चालली आहे. शनिवारी एकाच दिवसात १ लाख ५२ हजार ४०० नवे रुग्ण आढळले. देशात ३१ मार्चला ७२ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळले हाेतेे. ३ एप्रिलला हा आकडा १ लाखावर गेला होता. म्हणजे देशात १० दिवसांत दुप्पट रुग्णवाढ झाली. कोरोनाच्या सुरुवातीस देशाने साडेतीन महिन्यांनंतर दीड लाखावर रुग्णांचा आकडा गाठला होता. आता इतके रुग्ण एकाच दिवसात सापडत आहेत. संसर्गाचा पहिला पीक १६ सप्टेंबरला आला होता. तेव्हा एका दिवसात ९७,८६० नवे रुग्ण आढळले होते.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र, पंजाब, केरळ, छत्तीसगडसारख्या राज्यांत सर्वात जास्त रुग्ण आढळत होते. मात्र आता जास्त लोकसंख्येच्या यूपी, बिहार, बंगालसारख्या राज्यांत रुग्ण वाढत आहेत. देशातील ७३% लोकसंख्येच्या १० राज्यांत १५ दिवसांत रुग्ण दुपटीने वाढले. महाराष्ट्रात दीडपट, यूपीत ९ व बिहारमध्ये १० पट वाढ झाली. देशातील एक तृतीयांश लाेकसंख्या यूपी, बिहार व बंगालसारख्या राज्यांत राहते. या तिन्ही राज्यांतील रुग्णसंख्या १५ दिवसांतच आठ पटीने वाढली आहे. या राज्यांत १५ दिवसांत चाचण्या दीडच पटीने वाढवल्यावर ही स्थिती आहे. मोठ्या राज्यांत हाच वेग कायम राहिला तर पुढील १५ दिवसांत देशांत चिंताजनक स्थिती उद्भवू शकते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.