आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India Updates:  In 24 Hours 43,640 Patients Are Found; News And Live Updates

कोरोना देशात:गेल्या 24 तासांत आढळले 43 हजार 640 नवे रुग्ण, 56 हजार 643 बरे तर 722 मृत्यू्; नवीन संक्रमितांचा आकडा 8 दिवसात 50 हजारांपेक्षा कमी

नवी दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सलग दुसऱ्या दिवशी नवीन प्रकरणांमध्ये घट

देशात कोरोना महामारीचा प्रार्दुभाव दिवसेंदिवस कमी होत आहे. गेल्या 24 तासांत देशात 43 हजार 640 नवीन कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली आहे. यात 56 हजार 643 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 722 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीतदेखील घट होताना दिसत आहे. दरम्यान, शुक्रवारी देशात सक्रिय रुग्णांच्या संख्येत 14 हजार 34 ने घट झाली. देशात सक्रिय रुग्णांचा आकडा 5 लाखांपेक्षा कमी झाला असून सध्या 4 लाख 90 हजार लोकांवर उपचार सुरु आहे.

कोरोनाच्या नवीन प्रकरणासोबत देशातील मृत्यूचा आकडादेखील कमी होत आहे. मृत्यूची ही आकडेवारी गेल्या 81 दिवसांतील सर्वात कमी आहे. यापूर्वी 7 एप्रिल रोजी 684 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तर दुसरीकडे नवीन संक्रमितांची संख्या गेल्या 8 दिवसांत 50 हजारांपेक्षा खाली आली आहे.

सलग दुसऱ्या दिवशी नवीन प्रकरणांमध्ये घट
कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरताना दिसत आहे. शुक्रवारी देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या नवीन प्रकरणांमध्ये घट झाली. यापूर्वी बुधवारी 48 हजार 606 तर गुरुवारी 46 हजार 781 नवीन कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली होती.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 43,640
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 56,643
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 722
  • आतापर्यंत एकूण संक्रमित : 3.05 कोटी
  • आतापर्यंत एकूण बरे झालेले रुग्ण : 2.95 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.01 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.90 लाख
बातम्या आणखी आहेत...