आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Corona Virus Outbreak Updates: In 24 Hours 54,286 Patients Are Found; News And Live Updates

कोरोना देशात:एका दिवसांत आढळले 54,286 नवे रुग्ण, 69,130 बरे तर 1,323 मृत्यू; 5 राज्यांतील सक्रिय रुग्णांचा आकडा 50 हजारांवर

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 6.21 लाख लोकांवर उपचार सुरु आहे

देशात कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 54 हजार 286 कोरोनाबाधीतांची नोंद झाली आहे. यामध्ये 69 हजार 130 लोक उपचार घेत बरे झाले तर 1 हजार 323 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील सक्रिय रुग्णांच्या आकडेवारीतदेखील दिवसेंदिवस घट पाहायला मिळत आहे. काल बुधवारी देशातील सक्रिय रुग्णांच्या संख्येत 16 हजार 183 ने घट झाली.

देशातील अनेक राज्यांत सक्रिय रुग्णांचा आकडा कमी होत आहे. परंतु, देशात अजूनही 5 राज्ये असे आहेत, जेथे सक्रिय रुग्णांचा आकडा 50 हजारांवर आहे. यामध्ये महाराष्ट्र (1.21), कर्नाटक (1.16), केरळ (99,389), तमिलनाडु (52,884) और आंध्र प्रदेश (51,204) राज्यांचा समावेश आहे.

देशात कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात एकूण नवीन रुग्ण : 54,286
  • मागील 24 तासात एकूण बरे झालेले रुग्ण : 69,130
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 1,323
  • आतापर्यंत एकूण संक्रमित रुग्ण : 3 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 2.90 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 3.92 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या एकूण रुग्णांची संख्या : 6.21 लाख
बातम्या आणखी आहेत...