आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak In India, Vaccination News And Updates Sputnik V's Commercial Launch In Final Stages; After Hyderabad, It Will Now Be Available In More Than 9 Cities, Including Mumbai And Kolkata

कोरोना लस:स्पुतनिक V चे कॉमर्शियल लॉन्च अंतिम टप्प्यात; हैदराबादनंतर आता मुंबई, कोलकातासह 9 पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध होणार

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भारतात डॉ. रेड्डी लेबोरेट्रीज स्पुतनिक-V चे क्लीनिकल ट्रायल करत आहे

कोरोनाची रशियन व्हॅक्सीन स्पुतनिक-V लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात या व्हॅक्सीनचे क्लीनिकल ट्रायल करणाऱ्या डॉ. रेड्डी लेबोरेट्रीजने बुधवारी याबाबत माहिती दिली.

हैदराबादमधील डॉ. रेड्डीज कंपनीने सांगितले की, भारतात स्पुतनिक-V व्हॅक्सीनच्या पायलट सॉफ्ट लॉन्चला आता बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, बद्दी, चेन्नई, विशाखापट्टनम, मिर्यालागुडा आणि कोल्हापूरसारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवले जाईल. त्यानंतर शहरांची संख्या वाढवली जाईल.

कंपनीने सांगित्यानुसार, कोविन प्लॅटफॉर्मवर रजिस्ट्रेशनसाठी सामान्यांना याच्या कॉमर्शियल लॉन्चिंगपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. कंपनीसध्या हैदराबादमध्ये याचा वापर करत आहे. हैदराबाशिवाय, दिल्लीतील इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलमध्येही ही लस उपलब्ध आहे.

बातम्या आणखी आहेत...