आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विक्राळ होत चाललेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग आधीपेक्षा वेगवान आहे. मुंबई-रायपूरसारख्या शहरांत आता दर १०० चाचण्यांमागे २० पेक्षा जास्त नवे रुग्ण आढळू लागले आहेत. ते सप्टेंबर २०२० मधील पीकच्या दुपटीहून जास्त आहेत. डब्ल्यूएचओनुसार, संसर्गाचा दर ५% पेक्षा कमी हवा. म्हणजे दर १०० चाचण्यांत ५ पेक्षा जास्त रुग्ण आढळू लागले तर महामारी नियंत्रणाबाहेर गेल्याचे समजले जाते. भारतातील अनेक शहरांत हा दर २० टक्क्यांच्याही वर गेला आहे. यातील बहुतांश शहरे महाराष्ट्रातील आहेत. दुसरीकडे, उत्तर प्रदेश, बिहार व गुजरातेत स्थिती सध्या नियंत्रणात आहे. तेथे संसर्गाचा दर ४ टक्क्यांच्या खाली आहे. २३ राज्यांत नवे रुग्ण वाढत आहेत. महाराष्ट्र, छत्तीसगड, पंजाब व गुजरातेत रोजच्या रुग्णांची संख्या सप्टेंबर २०२० मधील पीकपेक्षाही जास्त आहे.
...मात्र, निवडणुकीच्या राज्यांत दर आश्चर्यजनकरीत्या घटला
तामिळनाडू 3.48 12.95
प. बंगाल 5.42 9.40
या शहरांत नवे रुग्ण जास्त, मात्र संसर्गाचा दर नियंत्रणात
अहमदाबाद 3.72 7.42
सुरत 2.60 5.94
शहरांच्या स्थितीत बदल
संसर्ग 2020 पीक दर (%) काळातील दर
नागपूर 26.41 13.82
पुणे 24.21 14.78
मुंबई 23.87 13.42
रायपूर 20.68 7.21
चंदीगड 15.75 13.03
भोपाळ 13.68 7.08
जालंधर 11.53 5.75
इंदूर 11.42 7.17
दिल्लीत आता २४ तास लसीकरण होणार
दिल्ली सरकारने २४ तास लसीकरणाचे निर्देश दिले आहेत. केंद्राचे फेब्रुवारीतील हे निर्देश लागू करणारे दिल्ली पहिलेच राज्य ठरले आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह यांनी गृहमंत्री नरोत्तम मिश्रा व इतर नेत्यांना मास्क वापरणे, इतरांना प्रेरित करण्यास सांगितले आहे. अनेक नेते सार्वजनिक कार्यक्रमांत मास्कविनाच दिसले होते. चाचण्या वाढल्यामुळे तामिळनाडू व पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांत संसर्गाचा दर घटला आहे. मात्र, ज्या वेगाने या राज्यांत नवे रुग्ण वाढत आहेत, संसर्गाच दरही गेल्या आठवड्याच्या तुलनेत एक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.