आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak India, 8th May LIVE Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Bihar Punjab Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देशात:रुग्णांचा आकडा 59 हजार 203 वर: एकाच आठवड्यात 21 हजार संक्रमित वाढले, तर 6827 कोरोनामुक्त झाले

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
हा फोटो जम्मू-काश्मीरमधील पुंछचा आहे. येथील एका व्यक्तीने नोटा आणि मास्क सॅनिटाइज करुन उन्हात वाळवत टाकल्या आहेत. - Divya Marathi
हा फोटो जम्मू-काश्मीरमधील पुंछचा आहे. येथील एका व्यक्तीने नोटा आणि मास्क सॅनिटाइज करुन उन्हात वाळवत टाकल्या आहेत.
  • मागील 24 तासात देशभराच 1475 रुग्ण ठीक झाले, हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा आहे
  • आयआयटी दिल्लीच्या स्टार्टअपने एनसेफ मास्क बनवला, दावा- 50 वेळा या चा वापर करु शकता

देशभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 59 हजार 203 वर पोहचला आहे. शुक्रवारी(दि.8) महाराष्ट्रात 1089, तमिळनाडूमध्ये 600, गुजरातमध्ये 390, उत्तर प्रदेशमध्ये 143, मध्यप्रदेशमध्ये 89, पंजाबमध्ये 87, राजस्थानमध्ये 64, बंगालमध्ये 130सह देशभारत 2800 पेक्षा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 21 हजार 485 नवीन रुग्ण सापडले आहेत. हा एकूण आकड्यांच्या  38% आहे. यादरम्यान 6827 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. 

दरम्यान, गुरुवारी देशभरात 3344 नवीन रुग्ण समोर आले होते. हे आकडे covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, देशात एकूण 56 हजार 342 संक्रमित आहेत.  37 हजार 916 अॅक्टीव्ह रुग्णांवर उपचार सुरू असून 16 हजार 539 ठीक झाले आहेत. तसेच, आतापर्यंत 1886 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे.

कोरोना संबंधित अपडेट्स

  • कोलकाताच्या इंडियन म्यूजिममध्ये तैनात सीआयएसएफच्या एका सब इंस्पेक्टरचा गुरुवारी संक्रमणामुळे मृत्यू झाला.
  • आयआयटी दिल्लीच्या स्टार्टअप नॅनोसेफ सॉल्यूशनने एनसेफ मास्क बनवला. दावा आहे की, हा 99.2% पर्यंत बॅक्टेरिया रोखतो आणि या मास्कचा 50 वेळा वापर करता येतो.
  • मध्यप्रदेशच्या इंदुरमध्ये महिला ई-रिक्शा चालकांना लॉकडाउनदरम्यान रिक्शा चालवण्यास मंजुरी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी ही मंजुरी देण्यात आली आहे. यादरम्यान चालकाला सॅनिटायजर, ग्लव्स आणि मास्क उपलब्ध करुन दिले जातील.
  • मध्यप्रदेशच्या होशंगाबादमध्ये दारु दुकानातील ग्राहकांच्या बोटांवर शाई लावण्यात येत असून, त्यांची माहितीदेखील लिहून घेतली जात आहे.

26 राज्य, 7 केंद्र शासित प्रदेशात कोरोनाचे संक्रमण

कोरोना व्हायरसचे संक्रमण देशातील 26 राज्य आणि 7 केंद्र शासित प्रदेशात पसरले आहे. यात दिल्ली, चंडीगड, अंडमान-निकोबार, जम्मू-काश्मीर, लद्दाख, पुडुचेरी आणि दादर आणि नगर हवेली सामील आहेत.

बातम्या आणखी आहेत...