आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Corona Virus Outbreak India Cases And Deaths 1 September News And Updates; Maharashtra Pune Madhya Pradesh Indore Rajasthan Uttar Pradesh Haryana Punjab Bihar Novel Corona (COVID 19) Death Toll India Today

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:संक्रमितांच्या संख्येत 6 दिवसांत मोठी घसरण, 24 तासांत 68,766 रुग्ण आढळले, 817 मृत्यू; आतापर्यंत 36.87 लाख प्रकरणे

नवी दिल्ली5 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 24 तासांत 64,435 रुग्ण बरे झाले, सध्या 7.84 लाख अॅक्टीव्ह रुग्ण
 • रिकव्हरी रेटमध्ये 1% वाढ, आतापर्यंत 76.85% रुग्ण बरे झाले
 • आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती चिंताजनक, ऑक्सिजन पातळी अचानक घसरली

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 36 लाख 87 हजार 939 झाली आहे. मागील 24 तासांत 68 हजार 766 रुग्णांची वाढ झाली. तर 64 हजार 435 रुग्ण बरे झाले. तसेच 817 रुग्णांचा मृत्यू झाला. संक्रमितांच्या आकडेवारीत मागील 6 दिवसांत आणि मृतांच्या आकडेवारीत गेल्या 28 दिवसांत मोठी घसरण झाली आहे. याआधी 25 ऑगस्ट रोजी 66 हजार 873 रुग्ण आढळले होते. तर 3 ऑगस्ट रोजी 806 रुग्णांचा मृत्यू झाला होता.

देशाच्या रुग्ण बरे होण्याचा दरात देखील 1% वाढ झाली आहे. रिकव्हरी रेट आता 76.85% झाला आहे. म्हणजेच आता 100 रुग्णांपैकी 76 लोक कोरोनामुक्त होत आहेत. आतापर्यंत 65 हजार 435 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या 7.83 लाख रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ही आकडेवारी covid19india.org नुसार आहे.

कोरोना अपडेट्स...

 • आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारी रात्री अचानक ऑक्सिजन पातळी कमी झाल्यामुळे त्यांना जीएमसीएच रुग्णालयात दाखल केले होते. राज्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, डॉक्टरांनी त्यांना एक युनिट प्लाझ्मा आणि ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 • पंजाब सरकारने सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत लॉकडाउन निर्बंध सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. संध्याकाळी 7 ते पहाटे 5 या कालावधीत शहरी भागातही कर्फ्यू लागू राहील. याव्यतिरिक्त, 167 महानगरपालिकांमध्ये शनिवारी व रविवारी लॉकडाउनदेखील कायम राहील.
 • पश्चिम बंगालमधील कंटेनमेंट झोनमधील लॉकडाऊन 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आला आहे. 8 सप्टेंबरपासून मेट्रो सेवा टप्प्याटप्प्याने सुरू केली जाईल, असे राज्य सरकारने म्हटले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत शाळा व महाविद्यालये बंदच राहतील. यासोबत चित्रपटगृहे, स्विमिंग पूल, मनोरंजन पार्क देखील बंदच राहणार आहेत.
 • आंतरराष्ट्रीय उड्डाणे विषयी डीजीसीएने सांगितले की, आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरील बंदी आता 30 सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. देशातील आंतरराष्ट्रीय उड्डाणे 23 मार्चपासून बंद आहेत. केवळ परदेशात अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी वंदे भारत मिशन अंतर्गत एअर इंडियाची उड्डाणे सुरू आहेत.
 • दिल्लीत बाहेरून येणाऱ्या लोकांसाठी बस स्थानकांवर कोरोना टेस्ट सुविधा सुरू करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. दिल्ली सरकारला 7 दिवसांत ही सुविधा सुरू करावी लागेल.
Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser