आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना अपडेट:देशातील एकूण रुग्णसंख्या 24.56 लाखांवर, तर 48,117 पेक्षा जास्त मृत्यू; एकट्या महाराष्ट्रात 5.60 लाख रुग्ण

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

फॉर्मास्यूटिकल कंपनी जायडस कॅडिलाने गुरुवारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर औषध भारतीय बाजारात लॉन्च केले. या औषधाचे नाव 'रेमडेक' ठेवले आहे. रेमडेकच्या 100 मिलीग्राम औषधाची किंमत 2,800 रुपये ठरवण्यात आली आहे. जायडस कॅडिलाने सांगितले की, हे औषध सरकारी आणि खासगी रुग्णालयात मिळेल. जायडस देशातील पाचवी कंपनी आहे, ज्यांनी अँटीवायरल औषध लॉन्च केले आहे. यापूर्वी फार्मा कंपनी हेटेरो लॅब्स, सिप्ला, मायलन एनवी आणि जुबिलेंट लाइव्ह सायंसेसने औषध लॉन्च केले आहे.

दरम्यान देशातील रुग्णांचा एकूण आकडा 24 लाख 56 हजार 785 झाला आहे. गुरुवारी देशात 61 हजार 650 पेक्षा जास्त रुग्णांची संख्या वाढली. सध्या देशभरात 6,59,435 रुग्णांवर उपचार सुरू असून, 17,48,750 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी covid19india वरील माहितीच्या आधारे आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात गुरुवारी 11,813 रुग्णांची नोंद झाली. तर, 413 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच राज्यातील एकूण रुग्णसंख्या 5,60,126 झाली आहे, तर एकूण मृतांचा आकडा 19,063 झाला आहे. सध्या राज्यात 1,49,798 रुग्णांवर उपचार सुरू असून, 3,90,958 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

0