आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना देश:गेल्या 24 तासांमध्ये 81 हजार 911 रुग्ण वाढले, 79 हजार 202 रुग्ण बरेही झाले, देशात आतापर्यंत 49.26 लाख प्रकरणं

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सोमवारी 1054 लोकांचा झाला मृत्यू, यासोबतच आतापर्यंत 80 हजार 808 लोकांनी गमावला आहे जीव
  • गेल्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त 17066 रुग्ण वाढले आणि 15789 लोक बरेही झाले

देशात कोरोना रुग्णांचा आकडा 49 लाखांच्या पार गेला आहे. 24 तासांमध्ये 81 हजार 911 लोक संक्रमित झाले आहेत. यासोबतच संक्रमितांची संख्या 49 लाख 26 हजार 914 झाली आहे. दिलासादायक म्हणजे यामध्ये 38 लाख 56 हजार 246 लोक बरेही झाले आहेत.

तिकडे, दिल्लीचे डिप्टी सीएम मनीष सिसोदियांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. सोमवारी त्यांनी ट्विट करत याविषयी माहिती दिली. यासोपूर्वी दिल्लीचे तीन इतर आमदार गिरीश सोनी, प्रमिला तोकस आणि विशेष रवी यांना देखील संक्रमण झाले आहे. सिसोदियांसह तीन आमदार सोमवारी विधानसभा सत्रात सहभागी होऊ शकलेले नाही.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मंगळवारी सकाळी आपली आकडेवारी जाहीर केली. यानुसार सोमवारी 83 हजार 808 केस समोर आल्या. तर 1054 लोकांचा मृत्यू झाला. यासोबतच देशातील संक्रमितांचा आकडा वाढून 49 लाख 30 हजार 237 झाला आहे. यामध्ये 9 लाख 90 हजार 61 अॅक्टिव्ह केस आहेत. 38 लाख 59 हजार 400 रुग्ण बरे झाले आहेत. तर आतापर्यंत 80 हजार 776 रुग्णांचा जीव गेला आहे.