आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak India Cases, Vaccination LIVE Update | Novel Corona (COVID 19) Death Toll India Today,6th June 2021

दिलासादायक बाब:शनिवारी देशभरातील 1.89 लाख संक्रमितांची कोरोनावर मात; मागील 10 दिवसात 9.42 लाख अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये घट

नवी दिल्ली14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शनिवारी 1.14 लाख नवीन संक्रमित आढळले, तर 2,681 रुग्णांचा मृत्यू

देशातील कोरोनाची लाट हळुहळू ओसरताना दिसत आहे. शनिवारी देशभरात कोरोनाचे 1 लाख 14 हजार 415 रुग्ण आढळले. हा आकडा मागील 61 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी, 5 एप्रिलला 96,573 रुग्ण आढळले होते. तर, 1 लाख 89 हजार 89 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दुःखद बाब म्हणजे शनिवारी 2,681 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

दररोज जास्तीत जास्त रुग्ण ठीक होत असल्यामुळे अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येतही घट होत आहे. मागील 10 दिवसात अॅक्टीव्ह रुग्णांच्या संख्येत 9 लाख 42 हजार 424 ची घट झाली आहे. 14 एप्रिलनंतर पहिल्यांदाच अॅक्टीव्ह रुग्णांचा आकडा 15 लाखांच्या खाली आला आहे.

देशातील कोरोनाची आकडेवारी

  • शनिवारी नवीन रुग्ण आढलले: 1.14 लाख
  • शनिवारी ठीक झाले: 1.89 लाख
  • शनिवारी झालेले मृत्यू: 2,681
  • एकूण संक्रमित: 2.88 कोटी
  • आतापर्यंत ठीक झाले: 2.69 कोटी
  • एकूण मृत्यू: 3.46 लाख
  • सध्या उपचार सुरू असलेली संख्या: 14.73 लाख
बातम्या आणखी आहेत...