आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak India | Novel Covid 19 Cases 07 May 2020 Live News And Updates

देशात कोरोना:देशभरात कोरोना संक्रमितांचा आकडा 55 हजार 792 वर: दिल्लीमध्ये आज 37 आयटीबीपी जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळले

नवी दिल्ली3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बंगळुरूमध्ये कोरोना वॉरिअर्सच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. - Divya Marathi
बंगळुरूमध्ये कोरोना वॉरिअर्सच्या सन्मानार्थ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
  • अश्वगंधा, यष्टिमधुसारख्या आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्या सुरू

देशात कोरोना संक्रमितांचा आकडा 55 हजार 792 झाला आहे. गुरुवारी महाराष्ट्रात 1362, गुजरात 388, तमिळनाडू 508, पंजाबमें 118, राजस्थान  83, उत्तरप्रदेश 73 सह विविध राज्यात 2800 पेक्षा जास्त रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्या. दिल्लीमध्ये आयटीबीपीच्या 37 जवानांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण संख्या 82 वर गेली आहे.

देशात आजपासून आरोग्य कर्मचारी आणि जास्त जोखमिच्या परिसरांमधील लोकांवर अश्वगंधा, यष्टिमधु, पीपली आणि आयुष-64 सारख्या आयुर्वेदिक औषधांच्या चाचण्या केल्या जाणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी गुरुवारी ही माहिती दिली. सध्या या सर्वांना हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन गोळ्या दिल्या जात होत्या.

यापूर्वी बुधवार देशभरात 3602 संक्रमित वाढले. तर, 15 हजार 257 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

महाराष्ट्रात बुधवारी 1233 नवीन रुग्ण समोर आले आहेत, तर 34 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात संक्रमणामुळे आतापर्यंत 651 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ही आकडेवारी covid19india.org आणि राज्य सरकारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आहे. केंद्रीयआरोग्य मंत्रालयानुसार देशात एकूण 52 हजार 952 संक्रमित आहेत. 35 हजार 902 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहे. 15 हजार 2066 ठीक झाले आहे, तर 1783 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

देशातील बहुतांश भागात 4 मेपासून लॉकडाऊन 3.0 अंतर्गत अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. अहमदाबादेत 15 मेपर्यंत फळे, भाजीपाला, धान्य आणि इतर सर्व दुकाने आणि ऑनलाइन डिलिव्हरी बंद राहील. औषधे आणि दुधाची दुकाने सुरू राहतील. लॉकडाऊन कडक करण्यासाठी बीएसएफच्या 6 आणि सीआयएसएफची एक कंपनी गस्त घालेल. छत्तीसगडमध्ये दर शनिवार-रविवार पूर्ण लॉकडाऊन राहील.

औरंगाबादमध्ये दुकानांसाठी सम-विषम सूत्र लागू

औरंगाबादेत रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन शिथिल न करता जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानांसाठी सम-विषम तारखांचे सूत्र लागू करण्यात आलेले आहे.

मुंबईत एका डीसीपीला संसर्ग, चालकामुळे झाली लागण

महाराष्ट्रात 1233 नवे रुग्ण आढळले. एकूण रुग्णसंख्या 16,758 झाली आहे. मुंबईत 769 नवे रुग्ण आढळले. मुंबईत डीसीपी दर्जाच्या एका आयपीएस अधिकाऱ्याला संसर्ग झाला आहे. त्यांना चालकामुळे संसर्ग झाल्याचे मानले जात आहे. गुजरातेत 380 नव्या रुग्णांसह एकूण 6625 रुग्ण झाले आहेत. अहमदाबादेत रुग्णसंख्या 4735 झाली आहे.

कर्नाटक : 1610 कोटी रुपयांचे मदत पॅकेज

कोरोनाचा संसर्ग नियंत्रणासाठी लागू लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या लोकांच्या मदतीसाठी कर्नाटक सरकारने 1610 कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले आहे. यात शेतकरी, हातमागधारक, कामगार, फुलोत्पादक, लाँड्रीचालक, केशकर्तन करणारे व ऑटो-टॅक्सीचालक आदींना फायदा होईल. कर्नाटक सरकारने 11 टक्के एक्साइज शुल्कही वाढवले आहे.