आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak: Modi Said Don't Let Corona Vaccination Slow Down At Epidemic At The Meeting; News And Live Updates

कोरोना आढावा बैठक:कोरोना लसीकरणाची गतीकमी होऊ देऊ नका : मोदी; पंतप्रधानांनी बैठकीत घेतला कोरोना महामारीचा आढावा

नवी दिल्ली2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदींनी पुढील काही महिन्यांत लसींचे उत्पादन वाढवण्याच्या योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेतला

देशातील कोरोनाच्या स्थितीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी आढावा बैठक घेतली. बैठकीत त्यांना राज्यांतील कोरोनाच्या स्थितीची माहिती देण्यात आली. मोदींनी औषधांचा तुटवडा, लसीकरण याबाबत निर्देश दिले. राज्यांनी कोरोना लसीकरणाची गती कमी होऊ देऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. पंतप्रधान कार्यालयाने सांगितले की, १२ राज्यांत एक लाखापेक्षा जास्त सक्रिय रुग्ण असल्याची तसेच सर्वात प्रभावित जिल्हे आणि राज्यांतील आरोग्य सुविधांच्या पायाभूत आराखड्याबाबतही माहिती देण्यात आली.

आरोग्यसेवांच्या पायाभूत आराखड्यात सुधारणा करण्यासाठी आवश्यक पैलूंबाबत राज्यांना मदत दिली जावी आणि मार्गदर्शन केले जावे, असे निर्देशही पंतप्रधानांनी दिले. पंतप्रधानांनी औषधांच्या उपलब्धतेचाही आढावा घेतला. त्यांना रेमडेसिविरसहित इतर औषधांच्या उत्पादनात वेगाने होत असलेल्या वाढीबाबत माहिती देण्यात आली. मोदींनी पुढील काही महिन्यांत लसींचे उत्पादन वाढवण्याच्या योजनांच्या प्रगतीचाही आढावा घेतला. लॉकडाऊन असला तरी लसीकरणाची सुविधा दिली जावी, असे निर्देश मोदींनी दिले.

बातम्या आणखी आहेत...