आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak Updates: S; A Member Of The Covid Task Force Dr Shashank Joshi Said There Are No Statistics On Delta Plus As A Crisis; News And Live Updates

युद्ध कोरोनाविरुद्ध:‘डेल्टा प्लस’ला संकट मानण्यासारखी कोणतीच आकडेवारी उपलब्ध नाही; कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांचे मत

पुणे-मुंबई / नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • घाबरू नका, पण संसर्ग वाढू नये यासाठी रोज काळजी घ्या

जगभर चिंतेचे कारण ठरलेल्या कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचे भारतात ४० हून अधिक रुग्ण आढळले असले तरी या प्रकारच्या कोरोना विषाणूविषयी चिंता करण्याइतपत पुरेसा डाटाच अजून उपलब्ध नसल्याचे महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी म्हटले आहे. तरीही काळजी घ्या, दुहेरी मास्क वापरा, गर्दी टाळा आणि लस घ्या, असे त्यांनी नमूद केले आहे.

विशेष म्हणजे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात या विषाणूबाधेचे २१ रुग्ण आढळले असल्याचे सोमवारी स्पष्ट केले होते. यात रत्नागिरीत ९, जळगावमध्ये ७, मुंबईत २ आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्गमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला असल्याचे म्हटले होते.

जळगावमध्ये दक्षता, आरोग्य यंत्रणा सतर्क
डेल्टा प्लस विषाणूचा जिल्ह्यात ७ जणांमध्ये संसर्ग आढळून आल्यानंतर या रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांवर जळगाव जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. मात्र, या विषाणूपासून होणारा प्रसार अगदीच कमी असल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात नव्याने रुग्णांची संख्या वाढू लागली आणि ती राेज १०० च्या पुढे गेली तर पुन्हा विषाणूची ‘जीनम सिकव्हेन्सिंग’ करण्यात येईल.

राज्यातील रुग्णांचे विलगीकरण
शरीरातील अँटिबॉडीजचा प्रभाव कमी करण्याची शक्ती या विषाणूत आहे. त्यामुळे राज्यातील रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगही सुरू आहे. सुदैवाने एकाचाही मृत्यू झालेला नाही. बरेचसे बरे होऊन घरी परतले आहेत. या व्हेरिएंटचा शास्त्रीय अभ्यास सुरू आहे, असे राजेश टोपे म्हणाले.

डेल्टा विषाणूचा प्रादुर्भाव अजून मर्यादित, गंभीर इजाही नाही
या डेल्टा विषाणूबाबत डॉ. शशांक जोशी यांनी दिव्य मराठीशी बाेलताना सांगितले की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नमुने घेतले जात असताना नवीन स्ट्रेन आल्याचे स्पष्ट झाले. मात्र, या विषाणूचा प्रादुर्भाव फार नाही. एक अपवाद वगळता राज्यात या विषाणूमुळे गंभीर इजा झाल्याचेही अद्याप समोर आलेले नाही. या सर्व रुग्णांचे नमुने घेतलेले असून पंधरा दिवसांनंतर त्याचा अहवाल मिळेल.

थोडी काळजी, पूर्ण सुरक्षा

  • हा डेल्टा व्हेरिएंट अँटिबॉडीजना प्रतिसाद देत नाही. त्यामुळे ज्यांनी लस घेतलेली नाही त्यांना बाधा होऊ शकते.
  • हा डेल्टा पॉझिटिव्ह नाही, निगेटिव्ह श्रेणीतील आहे. त्यामुळे त्याची परिणामकारकता व तीव्रता कमी आहे.
  • यासाठी थोडी काळजी घेतली आणि नियम पाळले तर या विषाणूंचा गंभीर प्रादुर्भाव होण्याचा धोका नाही.

देशातील चार राज्यांत संसर्ग
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा देशात महाराष्ट्र, केरळ, मध्य प्रदेश आणि तामिळनाडू या राज्यांत संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले असून या राज्यांत या विषाणूबाधेच्या रुग्णांत मात्र उल्लेखनीय वाढ झालेली नाही ही दिलासादायक बाब आहे.

व्हेरिएंट शेाधण्यासाठी जिल्हानिहाय नमुने घेणार
नाशिक : कोरोनाची दुसरी लाट ओसरत असतानाच आता कोरोनाचा डेल्टा प्लस व्हायरसचा प्रादुर्भाव पाहता याची पडताळणी करण्यासाठी राज्यात जिल्हानिहाय काेराेना पाॅझिटिव्ह रुग्णांचे नमुने घेतले जातील व ते स्वतंत्रपणे चाचणीसाठी पाठवण्यात येणार आहेत. डेल्टा प्लसचे रुग्ण शोधण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातील १०० नमुने जमा करून ते राष्ट्रीय विषाणू प्रयाेगशाळेत (एनअायव्ही, पुणे) पाठवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकित्सकांना करण्यात अाल्याची माहिती अाराेग्यमंत्री राजेश टाेपे यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...