आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Outbreak Updates: Supreme Court Comment On 'Corona' Death Certificate; News And Live Updates

कोरोना महामारी:मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’ का लिहीत नाही : सुप्रीम कोर्ट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संबंधित याचिकेवरील पुढील सुनावणी 11 जूनला होणार आहे

कोरोनामुळे मृत्यू होत असलेल्यांच्या मृत्यू प्रमाणपत्रावर त्याचा उल्लेख का केला जात नाही, सरकारने जर त्यांच्यासाठी एखादी योजना लागू केली तर मृत्यू झालेल्या कुटुंबाला त्याचा फायदा कसा दिला जाईल, अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला केली. पुढील सुनावणी ११ जूनला होईल.

सुप्रीम कोर्टातील याचिकेत कोरोनामुळे मृतांच्या कुटुंबांना ४ लाख रुपये भरपाई देण्यात यावी, अशी मागणी केली आहे. न्यायमूर्ती एम. आर. शहा म्हणाले की, ‘मृत्यू प्रमाणपत्रावर फुप्फुस व हृदय काम करत नाही असे काही वेगळेच कारण लिहिलेले असते. हे मी स्वत: पाहिले आहे. मृत्यूचे खरे कारण तर कोरोनाच असते. त्यामुळे सरकारने जर अशा लोकांसाठी एखादी योजना तयार केली तर मृत्यूचे कारण कोरोना संसर्ग आहे, हे कसे सिद्ध होईल? ते सिद्ध करण्यासाठी कुटुंबीयांना धावाधाव करावी लागेल.’ त्यावर सरकारी वकील म्हणाले, ‘मृत्यू प्रमाणपत्रावर भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या दिशानिर्देशांनुसारच कारण लिहिले जाते.

कोरोनाबाबत कुठलाही नियम तयार झालेला नाही.’ हा युक्तिवाद ऐकल्यानंतर, मृत्यू प्रमाणपत्रावर मृत्यूचे कारण कोरोना लिहिले जाऊ शकते का? अशा लोकांच्या कुटुंबीयांना सरकार ४ लाख रुपये भरपाई देऊ शकते का? याचे उत्तर १० दिवसांत द्यावे, असा आदेश कोर्टाने केंद्राला दिला.

बातम्या आणखी आहेत...