आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना अपडेट:फेब्रुवारीत दुसऱ्यांदा देशात १० हजारांपेक्षाही कमी नवे रुग्ण; मंगळवारपर्यंत 63,10,194 जणांचे लसीकरण

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या 4 दिवसांपासून मृत्यूचा आकडा शंभरच्या खाली

देशात कोरोनाच्या नव्या रुग्णांची संख्या कमी होत आहे. या महिन्यात दुसऱ्यांदा १० हजारपेक्षा कमी नव्या रुग्णांची नोंद झाली. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानुसार, मंगळवारी सकाळी ८ वाजेपासून गेल्या २४ तासांत ९,११० नवे रुग्ण आढळले. याआधी १ फेब्रुवारीला ८,६३५ नवे रुग्ण आढळले होते.

गेल्या ४ दिवसांपासून मृत्यूचा आकडा शंभरच्या खाली आहे. संसर्गाने ७८ नवे मृत्यू झाले आहेत, त्यामुळे बळींचा एकूण आकडा वाढून १,५५,१५८ झाला. गेल्या पाच आठवड्यांत रोजच्या मृत्यूंच्या सरासरीत ५५% घट झाली. ५ राज्ये-केंद्रशासित प्रदेशांत ६४.१% नव्या मृत्यूंची नोंद झाली. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात २११ च्या उच्च स्तरावरून फेब्रुवारी २०२१ च्या दुसऱ्या आठवड्यात रोजच्या सरासरी मृत्यूंत घट होऊन ही संख्या ९६ झाली आहे. देशात एकूण रुग्णांची संख्या १ कोटी ८ लाख, १,४३,६२५ सक्रिय रुग्ण व १,०५,४८,५२१ रुग्ण बरे झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...