आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Third Wave Warning Infection Peak October Home Ministry NIDM Report; News And Live Updates

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा इशारा:गृह मंत्रालयाच्या समितीने सरकारला सांगितले - कोरोनाच्या या लाटेचा मुलांना सर्वाधिक धोका, ऑक्टोबरमध्ये येईल कोरोनाची तिसरी लाट

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सप्टेंबरच्या अखेरीस तिसऱ्या लाटेचा प्रभाव

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. परंतु, गृह मंत्रालयाच्या एका पॅनलने कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत पंतप्रधान कार्यालयाला (पीएमओ) इशारा दिला आहे. देशात कोरोनाची तिसरी लाट ऑक्टोबर महिन्यांत येईल असा इशारा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या (एनआयडीएम) अंतर्गत स्थापन केलेल्या समितीने दिला आहे. विशेष म्हणजे या लाटेचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना असणार आहे. त्यामुळे संबंधित राज्यातील रुग्णालयांना आतापासून तयारी करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

अहवालानुसार, देशातील मुलांसाठी वैद्यकीय सुविधा, व्हेंटिलेटर, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, रुग्णवाहिका, ऑक्सिजनची संपूर्ण व्यवस्था असावी. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले आणि तरुणांवर याचा सर्वात जास्त परिणाम होईल असे मानले जात आहे. त्यामुळे त्यांना आतापासूनच सावध राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

मुलांचे मोठ्या संख्येने लसीकरण होण्याची आवश्यकता
हा अहवाल अशा वेळी समोर आला आहे, जेंव्हा केंद्र सरकार मुलांसाठी लसीकरण सुरु करण्याच्या तयारीत आहे. देशात सध्या मोठ्या संख्येने मुलांना लसीकरण करण्याची आवश्यकता असल्याचे अहवालात म्हटले आहे. यासोबतच मुल आणि त्यांचे पालक एकाच वार्डात राहू शकतील अस वार्ड तयार करण्याचा सल्लाही समितीने अहवालात दिला आहे.

सप्टेंबरच्या अखेरीस तिसऱ्या लाटेचा प्रभाव
अहवालानुसार, देशात सप्टेंबर महिन्याच्या शेवटी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा प्रभाव दिसून येईल. दरम्यान, ऑक्टोबरमध्ये दररोज 5 लाखांहून जास्त नवीन प्रकरणे समोर येतील. देशाला पुन्हा दोन महिने अडचणींचा सामना करावा लागू शकतो. यावेळी काही राज्यात लॉकडाऊनची गरज भासणार असे अहवालात म्हटले गेले आहे.

100 पैकी 23 रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज
नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या नेतृत्वाखालील समितीने गेल्या महिन्यात तिसऱ्या लाटेबाबत काही सूचना दिल्या होत्या. दरम्यान, देशात कोरोनाचे नवीन प्रकरणे वाढल्यास प्रत्येक 100 पैकी 23 कोरोनाग्रस्तांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज भासू शकते. अशा परिस्थितीत 2 लाख आयसीयू बेडची तयारी ठेवावी लागेल असे समितीने म्हटले होते.

यावेळी परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता
नीती आयोगाने यापूर्वी सप्टेंबर 2020 मध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत अंदाज लावला होता. दरम्यान, यात 100 संक्रमितांपैकी 20 रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज असल्याचे म्हटले होते. परंतु, आता त्यापेक्षा परिस्थिती अधिक गंभीर असू शकते.

गेल्या 24 तासात आढळले 25,420 प्रकरणे
देशातील कोरोनाच्या नवीन प्रकरणात चढ-उतार होत आहे. देशात गेल्या 24 तासात म्हणजे रविवारी 25 हजार 420 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, 44 हजार 103 लोक उपचार घेत बरे झाले तर यामध्ये 385 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत 3.16 कोटी लोक उपचार घेत बरे झाले आहे. यासोबतच सक्रिय रुग्णांतदेखील रविवारी 19 हजार 71 ने घट झाली. विशेष म्हणजे गेल्या 6 दिवसापासून सक्रिय रुग्णांत मोठी घट होत आहे. देशात आजघडीला 3.28 लाख सक्रिय रुग्ण आहेत.

बातम्या आणखी आहेत...