आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Treatment Cost In Gujarat; Hospital Charges Rs 12 Lakh Bill To Corona Patient In Surat

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुजरात कोरोना:उपचाराच्या नावाखाली उकळले 12.23 लाख रुपये, ठीक होण्यापूर्वीच दिला डिस्चार्ज

सूरत9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना उपचाराच्या नावाखाली सुरू असलेल्या खासगी रुग्णालयांचा खेळ परत एकदा समोर आला आहे. सूरतमधील एका ट्राय स्टार हॉस्पीटलमध्ये अॅडमिट असलेल्या रुग्णांकडून कोरोनाच्या उपचाराछ्या नावाखाली 12.23 लाख रुपये वसूल करण्यात आले. हॉस्पीटलमध्ये रुग्णावर 24 दिवस उपचार करण्यात आला, तरीदेखील रुग्ण पूर्णपणे ठीक झालेला नाही.

13 मे रोजी कोरोनाची लक्षणे दिसली,14 दिवस व्हेंटिलेटरवर ठेवले

झापा बाजार परिसरात राहणाऱ्या गुलाम हैदर यांना खोकला-सर्दीचा त्रास जाणवल्यानंतर 13 मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे नेण्यात आले होते. कोरोनाची लक्षणे आढळल्यानंतर त्यांना ट्राय स्टार हॉस्पीटलमध्ये अॅडमिट करण्यात आले.

रुग्णांचे भाऊ मुस्तफाने सांगितले की, हॉस्पीटलमध्ये गुलाम हैदर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 48 तासानंतर दुसरी रिपोर्ट निगेटिव्ह आली. पण, गुलाम हैदर यांना हॉस्पीटलमध्येच ठेवण्यात आले. डॉक्टरांनी सांगितले की, रुग्णाचे फुफ्फुस खराब आहे आणि त्यानंतर 14 दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले.

रुग्णाचे पाय अजूनही ठीक काम करत नाहीत

गुलाम मुस्तफा यांनी सांगितले की, 13 मे ते 30 मे पर्यंत 10 एक्स-रे, 20 लॅबोरेटरी रिपोर्ट, 3 सीटी स्कॅन करण्यात आले. यादरम्यान, 65 बिल बनवले. यात 4.22 लाख रुपयांचे औषधांचे बिल आणि 8 लाख रुपये हॉस्पीटलचे बिल होते. बिल भरल्यानंतरच रुग्णाला सुट्टी देण्यात आली. पुढे त्यांनी सांगितले की, गुलाम हैदर 5 भावांमध्ये सर्वात निरोगी होती. कोरोनाचा 24 दिवस हॉस्पीटलमध्ये उपचार केला, पण आजही त्यांना ठीक चालता येत नाहीये. त्यांची प्रकृती अजूनही ठीक झालेली नाही.

बातम्या आणखी आहेत...