आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारत, चीन, अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान या देशांमध्ये कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. चीन आणि ब्रिटनमध्ये कोरोनाच्या वाढत्या केसेसमुळे लोकांना हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाहीयेत. युक्रेनमध्ये दर आठवड्याला 50 ते 70 मृत्यू कोरोनामुळे होत आहेत. अमेरिकेतही परिस्थिती चांगली नाही. दरम्यान, ओमायक्रॉनच्या XBB 1.5 च्या सब-व्हेरिएंटचे 5 रुग्ण भारतात आढळून आले आहेत.
INSACOG ने मंगळवारी सांगितले की, या 5 रुग्णांपैकी 3 गुजरातमध्ये आढळले तर कर्नाटक आणि राजस्थानमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. दुसरीकडे, कोरोना महामारीच्या काळात 4000 हून अधिक लोकांना मास्क न घालण्याचा सल्ला दिल्याबद्दल जर्मनीतील एका महिला डॉक्टरला 2 वर्षे 9 महिन्यांचा तुरुंगवास सुनावण्यात आला आहे.
पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण-पश्चिम शहर वेनहेममधील स्थानिक न्यायालयाने महिला डॉक्टरला शिक्षा सुनावली. डॉक्टरवरने 4000 हून अधिक लोकांना मास्क न घालण्याचे सांगितले होते. यापैकी बऱ्याच लोकांना डॉक्टर महिला भेटलेलीही नाही. कोर्टात सुनावणीदरम्यान महिला डॉक्टरने मास्क घालणे हे लोकांच्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचा युक्तिवाद केला.
न्यायालयाने महिला डॉक्टरवर तीन वर्षांची कामाची बंदी घातली आहे. तसेच $29,550 दंड ठोठावला. डॉक्टरांच्या सहाय्यकालाही न्यायालयाने 2,700 युरोचा दंड ठोठावला आहे.
आता जाणून घ्या भारतातील कोरोनाची स्थिती...
देशात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. दरम्यान, सरकारी सूत्रांचा हवाला देत वृत्तसंस्था एएनआयने सांगितले आहे की बूस्टर डोसचा दुसरा डोस देशात दिला जाणार नाही. जोपर्यंत सर्व नागरिकांना प्रिकॉशन डोस दिला जात नाही तोपर्यंत सरकार यावर कोणताही निर्णय घेणार नाही. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 134 नवीन रुग्ण आढळले असून 3 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाचे 1609 सक्रिय रुग्ण आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.