आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

देशात कोरोना:13 दिवसांनंतर कोरोनाच्याबळींची संख्या पुन्हा 600 वर, देशातील रुग्णांची संख्या आज 90 लाखांवर जाणार

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • गेल्या २४ तासांत ६११ मृत्यू झाले आहेत. १३ दिवसांनंतरच प्रथमच बळींची संख्या ६०० वर गेली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ८९ लाख ९१ हजार ७६५ झाली आहे. शुक्रवारी हा आकडा ९० लाखांवर जाईल. गेल्या २४ तासांत ६११ मृत्यू झाले आहेत. १३ दिवसांनंतरच प्रथमच बळींची संख्या ६०० वर गेली आहे. याआधी ६ नोव्हेंबरला कोरोनामुळे ६७० जणांचा मृत्यू झाला होता. दुसरीकडे दिल्ली, केरळनंतर आता राजस्थाननेही चिंता वाढवली आहे. राजस्थानमध्ये गुरुवारी २,५४९ रुग्ण आढळले. ही एकाच दिवसातील सर्वाधिक संख्या आहे.

दरम्यान, केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, आम्ही लस निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून ४० ते ५० कोटी डोस खरेदी करण्याबाबत चर्चा करत आहोत. हे डोस पुढील वर्षी जुलैपर्यंत मिळावेत, असा आमचा प्रयत्न आहे.

केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांना कोरोना
केंद्रीय रसायने आणि खत मंत्री सदानंद गौडा यांना कोरोना झाला आहे. त्यांनी स्वत:ला आयसोलेट केले आहे. माजी संरक्षणमंत्री ए. के. अँटनी व त्यांच्या पत्नीलाही कोरोना झाला.

बातम्या आणखी आहेत...