आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Virus Vaccine India Latest News And Update | Coronavirus Vaccine India Trial News | Hyderabad Bharat Biotech Covaxin Trial Latest News; Human Trials To Begin In July

कोरोना व्हॅक्सीन:भारतात बनले कोरोनाचे पहिले औषध, 'कोव्हॅक्सीन'ला ड्रग कंट्रोलरने दिली मानवी चाचण्यांची मंजूरी

हैदराबाद3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हैदराबादची कंपनी भारत बायोटेक ह्यूमन ट्रायल सुरू करण्याच्या तयारीत

देशात कोरोनाचे पहिले औषध तयार झाले आहे. ‘कोव्हॅक्सीन’ नावाचे हे औषध हैदराबादची फार्मा कंपनी भारत बायोटेकने तयार केले आहे. या औषधाला इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजी, पुणेसोबत मिळून तयार केले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने ‘कोव्हॅक्सीन’ला मानवी परीक्षण करण्यास मंजूरी दिली आहे. याचे प्री-क्लीनिकल ट्रायल यशस्वी झालेहोते. यानंतर ह्यूमन ट्रायलला परवानगी दिली. या मानवी चाचण्या जुलैमध्ये होतील.

हैदराबादच्या जीनोम व्हॅलीमध्ये तयार झाले व्हॅक्सीन

भारत बायोटेकने दिलेल्या माहितीनुसार, व्हॅक्सीनला हैदराबादच्या जीनोम व्हॅलीच्या बीएसएल-3 (बायो-सेफ्टी लेव्हल 3) हाय कंटेनमेंट फॅसिलिटीमध्ये तयार करण्यात आले आहे. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशन (सीडीएससीओ) आणि आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालया ने पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मानवी परीक्षण करण्यास मंजूरी दिली आहे.

व्हॅक्सीनची घोषणा करणे मानाचे

कंपनीचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.कृष्णा एल्ला यांनी सांगितले की, “आम्हाला कोरोनाचे औषध घोषित करने मानाचे आहे. हे देशात तयार होणारे कोरोनाचे पहिले औषध असेल. याला आयसीएमआर आणि नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ वायरोलॉजीसोबत मिळून तयार केले आहे. सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायजेशनचा सपोर्ट आणि गायडंसमुळे या प्रोजेक्टला अप्रुव्हल मिळाले. आमचा रिसर्च आणि औषध तयार करणारी टीम न थकता काम करत आहे.”

आणखी 5 भारतीय कंपन्या व्हॅक्सीन तयार करण्याच्या शर्यतीत

भारत बायोटेकनुसार, प्री-क्लीनिकल ट्रायलमध्ये व्हॅक्सीनचा परिणाम चांगला मिळाला आहे. हे सुरक्षित आहे. इम्यून रेस्पॉन्सला वेग देते. भारत बायोटेकसोबतच भारतातील आणखी पाच कंपन्या कोरोनाचे औषध शोधण्याच्या कामात लागल्या आहेत.