आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Pune
  • Corona Virus Vaccine Serum Institute News And Update | Serum Institute Deal With Gates Foundation And Gavi For COVID Vaccine Preparation

स्वस्त कोरोना लस:सीरमची कोरोना प्रतिबंधक लस फक्त 225 रुपयांत मिळणार, 10 कोटी डोसची तयारी, वितरणासाठी गेट्स फाउंडेशन,'गावी’शी करार

पुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • गावी, गेट्स फाउंडेशनची एक संस्था आहे, गरीब देशांना लस पुरवण्याचे काम ही संस्था करते

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया भारतासह निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या ९२ देशांना केवळ २२५ रुपयांत (३ यूएस डॉलर) कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देणार आहे. शुक्रवारी ही घोषणा करण्यात आली. लसीच्या निर्मितीलाही वेग मिळावा आणि तिचे वितरण करता यावे त्यासाठी सीरमने बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशन तसेच जीएव्हीआय (गावी) या आंतरराष्ट्रीय लस संस्थांशी करार केला आहे. या लसीच्या दहा कोटी डोसची निर्मिती केली जाणार आहे.

या लसीला नियामक मंडळासह जागतिक आरोग्य संघटनेकडून परवानगी मिळाल्यावर निर्मितीची क्षमता वाढावी यासाठी ही भागीदारी केली जाणार आहे. त्यासाठी गेट्स फाउंडेशनकडून ‘गावी’ला १,१२५ कोटी रुपयांचा निधी पुरवला जाणार आहे. पुढच्या वर्षातील सहा महिन्यांच्या कालावधीत ही लस वितरित केली जाणार आहे. या निधीतून जोखमीतील सीरमच्या अ‍ॅस्ट्रॅजेनेका आणि अमेरिकेतील नोव्हाव्हॅक्स या कंपनीसोबत करार करण्यात आला आहे. त्याचबरोबर जर आवश्यकता भासली तर अतिरिक्त डोसची सुरक्षितता पाहण्यासाठीही पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.

गेल्या आठवड्यात ‘गावी’ ने ९२ देशांच्या अंतिम यादीला सहमती दर्शवली. सीरमची लस यशस्वी झाल्यास ९२ पात्र देशांना उपलब्ध होईल. याआधी सीरम इन्स्टिटयूट आणि ‘गावी’ या संस्थेसह अनेक फार्मास्युटिकल कंपन्यांसोबत करार केलेले असून त्याद्वारे मेंदूज्वर, डायरिया, न्युमोनिया आणि मीझल्सवर लसींची निर्मिती केली आहे. ही भागीदारी सुरक्षित आणि दर्जेदार लसी विकसित करण्याच्या भारताच्या ट्रॅक रेकॉर्डला अधोरेखित करते.

लस २०२१ मध्ये उपलब्ध करून देणार
सीरम इन्स्टिट्यूटने गावी आणि बिल अँड मेलिंडा गेट्स फाउंडेशनबरोबर भागीदारी केली आहे. भारतासह निम्न व मध्यम उत्पन्न असलेल्या ९२ देशांना केवळ २२४ रुपयांत (३ यूएस डॉलर) मध्ये कोरोना प्रतिबंधक लस २०२१ मध्ये उपलब्ध करून देणार आहोत. या विषाणूच्या प्रसाराने संपूर्ण जगाला अनिश्चिततेच्या खाईत ढकलले आहे. या माध्यमातून आम्ही लाखो लोकांचे प्राण या भयानक आजारापासून वाचवण्याच्या प्रयत्न करत आहोत. - डॉ. अदर पूनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी, सीरम इन्स्टिटयूट ऑफ इंडिया

बातम्या आणखी आहेत...