आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना देशात:गेल्या 24 तासात आढळले 39,071 नवे रुग्ण, 39,827 बरे तर 544 मृत्यू; मृतांचा हा आकडा 101 दिवसात सर्वात कमी

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात सध्या 4 लाख 24 हजार लोकांवर उपचार सुरु आहे.

देशातील कोरोनाचे नवीन प्रकरणे आणि सक्रिय रुग्ण संख्या जवळपास स्थिर आहे. म्हणजेच जेवढे नवीन प्रकरणे येत आहे त्यापेक्षा कमी किंवा जास्त रुग्ण उपचार घेत बरे होत आहे. गेल्या 24 तासात म्हणजे गुरुवारी 39 हजार 71 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली. दरम्यान, यात 39 हजार 827 रुग्ण उपचार घेत बरे झाले तर 544 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

एका दिवसातील मृतांचा आकडा गेल्या 101 दिवसातील सर्वात कमी आहे. यापूर्वी 5 एप्रिल रोजी 446 लोकांचा मृत्यू झाला होता. देशातील सक्रिय रुग्ण संख्यादेखील कमी जास्त होत आहे. बुधवारी यामध्ये 1 हजार 874 ने वाढ झाली तर गुरुवारी 1 हजार 316 ने घट पाहायला मिळाली. देशात सध्या 4 लाख 24 हजार लोकांवर उपचार सुरु आहे.

देशातील कोरोना महामारीचे आकडे

  • मागील 24 तासात आढळून आलेले एकूण नवीन रुग्ण : 39,071
  • मागील 24 तासात बरे झालेले रुग्ण : 39,827
  • मागील 24 तासात एकूण मृत्यू : 544
  • आतापर्यंत संक्रमित झालेले रुग्ण 3.10 कोटी
  • आतापर्यंत बरे झालेले रुग्ण : 3.01 कोटी
  • आतापर्यंत एकूण मृत्यू : 4.12 लाख
  • सध्या उपचार सुरु असलेल्या रुग्णांची संख्या : 4.24 लाख
बातम्या आणखी आहेत...