आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
अमितकुमार निरंजन
कोरोनामुळे जग थांबले आहे. मोठी लोकसंख्या घरात कैद आहे. अशा स्थितीत तज्ञ म्हणतात की, कोरोनामुळे आपले जीवन वेगाने बदलेल, विशेषत: तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण बाबतीत. ते म्हणतात की, काहीही स्पर्श न करण्याची सवय काँटॅक्टलेस अर्थव्यवस्थेत रूपांतरित होईल. तसेच रोग रोखण्याच्या नावाखाली लोकांची देखरेखही वाढेल, असा इशारा त्यांनी दिला. लोक गोपनीयतेसाठी डार्कनेटकडे मोठ्या प्रमाणात वळतील. या गरजा व संभाव्य धोके तज्ञांकडून समजून घेण्याचा प्रयत्न भास्करने केला.
काँटॅक्टलेस अर्थव्यवस्था: मनुष्यबळ मंत्रालयाच्या इनोव्हेशन सेलचे संचालक डॉ. मोहित गंभीर म्हणाले की, भविष्यकाळ संपर्कविरहित अर्थव्यवस्थेचा असेल. माणसांची कामे रोबोट्स करतील. वैद्यकीय प्राथमिक रोगनिदानदेखील स्पर्श न करता होईल. यात तापमान, हृदय गती, डायबिटीस काउंट रिअल टाइममध्ये बघितला जाईल. गावांसाठी टेलिमेडिसीन आणि तंत्रज्ञान विकसित केले जाईल.
टॉकिंग होम, अप्लायन्सेसचा वापर वाढेल. स्मार्ट बिल्डिंग तापमान, पाणी, विजेची मागणी वाढेल. देशांतर्गत वस्तूंचा वापर देखील वाढेल.
स्मार्ट इंडस्ट्रीज: आयआयटीमधील प्राध्यापक सुनील झा म्हणाले की, कमी मनुष्यबळामुळे उद्योगात जास्त उत्पादन होण्याची मागणी होत आहे. त्यामुळे बहुतेक कंपन्या रोबोटिक्सकडे वळत आहेत. स्मार्ट इंडस्ट्रीज संकल्पनेत कारखाना किंवा कंपनीमध्ये न जाता तुम्ही मशीनमधून काय तयार केले जाते, काय चुकीचे आहे हे घरून शोधू शकता. मशीन स्वतः दुरुस्त होईल. स्मार्ट इंडस्ट्रीचा नमुना आयआयटी दिल्ली येथे तयार करण्यात आला आहे.
निगराणी वाढेल: वैद्यकीय क्षेत्रातील इनोव्हेशन क्युरीसचे सीईओ सचिन गौर म्हणतात की, बहुतेक तंत्रज्ञान एआयच्या मदतीने विकसित केले जाईल. यामुळे लोकांवर देखरेख ठेवणे देखील वाढेल. अॅप्स आणि तंत्रज्ञानामुळे निगराणी ठेवण्याची शक्यता वाढण्याची दाट शक्यता आहे.
युजर डार्कनेटकडे वळतील: सायबर तज्ञ पवन दुग्गल म्हणाले, या वेळेला कोरोनापूर्वी आणि कोरोनानंतरही म्हटले जाऊ शकते. कोरोनाच्या आड, अनेक देश अशी पावले उचलत आहेत, जे त्यांना अधिक बळकट बनवतील. अॅपमधून डिजिटल स्वातंत्र्य काढून घेण्यात येईल. अशा परिस्थितीत लोक डार्कनेटकडे वळतील.
बेरोजगारी, गरिबी, महागाईचा सामना करावा लागेल
परिवर्तनाच्या या टप्प्यात जीवनातील आव्हानेही वाढतील. इस्रोचे माजी वैज्ञानिक आणि दिवंगत राष्ट्रपती एपीजे कलाम यांच्यासह व्हीजन २०२० या पुस्तकाचे लेखक वाय.एस. राजन म्हणतात- १०% पेक्षा कमी लोकांना रोबोटिक्स आणि कृत्रिम उत्पादनांची आवश्यकता असेल. दोन दशकांपूर्वीच्या समस्या 90% लोकसंख्येची वाट पाहत आहेत. दारिद्र्य, बेरोजगारी आणि महागाईचा सर्वाधिक फटका बसेल. उद्योगांचे दबाव आणि आवश्यकता वाढेल. श्रम कौशल्य आवश्यक असेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.