आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रेल्वेत कोरोना प्रवास करू शकणार नाही:RCF कपूरथळाची रेल्वेत CSIO सिस्टिम, हवा री-सर्क्युलेट करून महामारी नष्ट करणार

चंदीगड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी कौन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च-सेंटल सायंटिफिक इन्स्ट्रूमेंट्स ऑर्गनायझेशनची (सीएसआयआर-सीएसआयओ) डक्ट सिस्टिम रेल्वे आणि सार्वजनिक वाहतुकीच्या एसी बसमध्ये लावली जाणार आहे.

रेल्वेत झालेल्या चाचणीदरम्यान ती सुरक्षित असल्याचे ग्राह्य धरत हे तंत्रज्ञान रेल्वे डब्याचा कारखाना कपूरथळाला सोपवले आहे. आरडीएसओने विशेषत: रेल्वेंसाठी बनवलेल्या डिझाइनला मंजुरीही मिळाली आहे. बससाठी महामार्ग आणि भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने या तंत्रज्ञानासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. सीएसआयओच्या शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या या डक्ट यूव्हीसी डिस-इन्फेक्शन सिस्टिमला आता लिफ्टनुसारही तयार करण्यात आले आहे.

देशातील एसी आणि इलेक्ट्रॉनिक उत्पादने बनवणाऱ्या एका प्रसिद्ध कंपनीसोबत त्यांचा करार झाला आहे. ते आता कोरोनामुक्त एसी तयार करतील. लोकसभा आणि राज्यसभेत याचा उपयोग याआधीच होत आहे.

दीड वर्षाच्या मेहनतीनंतर यंत्रणा सज्ज, ३५ कंपन्या बसवत आहेत
ही डक्ट बनवणाऱ्या पथकाचेे नेतृत्व करणाऱ्या डॉ. हॅरी गर्ग यांनी सांगितले की, एसी किंवा बंद भागात कोरोना जास्त पसरतो, हे कोरोनाच्या सुरुवातीलाच झालेल्या अभ्यासात सिद्ध झाले होते. कोरोनासाठी तयार करण्यात आलेल्या सीएसआयआरच्या कोविड स्ट्रॅटेजिक ग्रुपने हा संसर्ग दूर करण्यासाठी खूप विचार केला. त्या दिवसात, प्रत्येकाने यूव्ही असलेली उत्पादने आणली होती, परंतु ती इतकी हानिकारक आहेत की त्याने कर्करोगदेखील होऊ शकताे. सुमारे दीड वर्ष विचार केल्यानंतर सर्वप्रथम हॉल किंवा ऑडिटाेरियमनुसार इन डक्ट यूव्हीसी डिस-इन्फेक्शन सिस्टिम तयार केली. त्याची क्षमता १०० लोकांच्या सभागृहासारखी होती. त्यामुळे कोणत्याही हाॅल किंवा ऑडिटाेरियममध्ये ७० टक्के हवा पुन्हा फिरते. इमटेक सेक्टर ३९ च्या मदतीनेे ते प्रमाणित केले. नंतर ते संसदेत मांडण्यात आले. साऊथ मॉलमध्येही लावण्यात आली. सर्वत्र यश मिळाल्यानंतर ३५ कंपन्यांना तंत्रज्ञान देण्यात आले असून ते हे तयार करून विकत आहेत. यूपी राज्य परिवहनच्या बसेसमध्ये हीच यंत्रणा बसवण्यात आली होती. त्यात बदल केला. या बसेस ५० किमी धावल्या असून यंत्रणा यशस्वी झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...