आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona Workers Going To Returning With New Hope, 70,000 Workers Returning In 27 Days

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुरत:कोराेनात जाणारे कामगार नव्या आशेने परत येताहेत, 27 दिवसांत परतले 70 हजार कामगार

सुरत ( लवकुश मिश्रा )10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • लॉकडाऊनदरम्यान आपल्या राज्यांत जाणारे कामगार परतू लागले

कोरोनाची भीती आणि भुकेमुळे लॉकडाऊनमध्ये आपल्या गावी गेलेले कामगार नव्या आशेने सुरतला परत येऊ लागले आहेत. गेल्या २७ दिवसांत ७० हजारांपेक्षा जास्त स्थलांतरित मजूर सुरतला परतले आहेत. अनलॉक-१ मध्ये कामगारांना कोरोनापेक्षा जास्त उदरनिर्वाहाची चिंता सतावत आहे. कारखान्याचे मालक कामगारांना फोन करून परत बोलावत आहेत आणि जास्त वेतन देण्याचे सांगत आहेत. यामुळे ज्या गतीने कामगार गावी गेले होते त्याच्या दुप्पट वेगाने शहरात परतू लागले आहेत. रेल्वेच्या कोविड विशेष रेल्वेंनी गुजरात येणाऱ्यांची संख्या तीन लाखांपेक्षा जास्त झाली आहे. यातील ७० हजारांपेक्षा जास्त कामगार सुरतला परतले.

यूपी-बिहारमधून सुरतला परतले आहेत ५० हजारांपेक्षा जास्त कामगार

यूपी- बिहारमधून ५० हजारांपेक्षा जास्त कामगार आले आहेत. याचे मोठे कारण जास्त वेतन आहे. ०९०४६ छपरा- सुरत ताप्ती गंगामधून १ ते २७ जूनपर्यंत २९ हजार प्रवासी आले. ०९०९० गाेरखपूर- अहमदाबाद रेल्वेने या काळात ३८ हजार, त्यात सुरतचे १८ हजार प्रवासी आहेत. ०९०८४ मुझफ्फरपूर- अहमदाबादने ३७ हजार जण आले.

राजस्थानहून रेल्वेने १७ हजार प्रवासी सुरतला परतले

राजस्थानातून ३८३७० प्रवासी गुजरातला आले, यातील १७ हजार सुरतला आले. पश्चिम बंगालमधून येणाऱ्या हावडा-अहमदाबाद रेल्वेने ३८३७० प्रवासी आले. यातील १३ हजार सुरतला आले. ०२९१८ निझामुद्दीन-अहमदाबादने एकूण १४७०२ प्रवासी अहमदाबादला आले.

बातम्या आणखी आहेत...