आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona's Joke Flies Jharkhand's Tana Bhagat, None Of The 22,000 Affected; Sattvic Lifestyle Became Healthy

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रेरणा:कोरोनाची टिंगल उडवतात झारखंडचे टाना भगत, 22 हजार लोकांमध्ये एकही बाधित नाही; सात्विक जीवनशैलीने झाले निरोगी

कुंदनकुमार चौधरी | रांची3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 8 जिल्ह्यांत राहणारे लोक शुद्ध शाकाहारी, बाहेरचे काहीच खात नाहीत

झारखंडमधील टाना भगत समुदायातील लोकांनी जीवनशैलीद्वारे कोरोनाला मात दिली आहे. राज्यातील ८ जिल्ह्यांत राहणारे २२ हजारांपेक्षा जास्त टाना भगत कोरोनाची टिंगलटवाळी करतात. समुदायातील एकही व्यक्ती पॉझिटिव्ह आढळली नाही. मांसाहार तर लांबच, लसूण- कांदाही खात नाहीत. अहिंसा, परिश्रम आणि सात्विकतेने भरलेली त्यांची जीवनशैली आजही तशीच आहे, जशी १०० वर्षांपूर्वी होती. पॉलिथीन वापरत नाहीत. घराबाहेर जाताना पानांपासून बनवलेला मास्क लावतात.

टाना भगत समुदाय झारखंडमधील ८ जिल्हे रांची, गुमला, लातेहार, लोहरदगा, चतरा, पलामू, खुंटी आणि सिमडेगा येथे राहतात. टाना भगत विकास प्राधिकरणानुसार गुमला जिल्ह्यात ९ तालुक्यांत ६४७८ टाना भगत आहेत. रांचीत त्यांची संख्या ४९३७ आहे. रांचीपासून ३२ किमी लांब लोयो पंचायतीतील सकरा गावातील सुकरा टाना भगत सांगतात की, निसर्गासोबत राहा असे टाना बाबा सांगायचे. स्वत: जे पिकवतो तेच आम्ही खातो. समुदायात भांडणेही होत नसल्याने कोणत्याही पोलिस ठाण्यात त्यांच्या विरोधात तक्रारही नाही.

बूट-चप्पल बाहेर, पाय धुऊनच घरात जातात

स्वच्छतेबाबत लोक जागरूक असल्याने या समुदायात कोरोनाचा प्रवेश होऊ शकला नाही. लहान-मोठे सर्व घरात जाण्याआधी पाय धुतात. बूट- चप्पल बाहेरच काढतात. कच्च्या घराच्या भिंती आणि दरवाजे शेणाने सारवतात. डाग लगेच दिसावेत म्हणून नेहमीच पांढरे कपडे घालतात.