आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Corona's New Double Mutant In Maharashtra, 771 Patients Of 3 Types In The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा कहर:महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा नवा डबल म्युटंट, देशात 3 प्रकारचे 771 रुग्ण; यंदा प्रथमच 53,406 नवे रुग्ण, 249 मृत्यू

नवी दिल्ली24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वेगाने वाढत्या रुग्णांसाठी नवे व्हेरियंट आणि डबल म्युटंट जबाबदार नाहीत

कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आरोग्य मंत्रालयाने बुधवारी महाराष्ट्र आणि दिल्लीत कोरोनाचा नवा ‘डबल म्युटंट’ व्हेरियंट (प्रकार) सापडल्याचे सांगितले. १८ राज्यांत कोरोनाच्या ३ व्हेरियंटचे ७७१ रुग्ण आढळले आहेत. त्यात ७३६ रुग्ण यूके व्हेरियंट, ३४ रुग्ण दक्षिण आफ्रिकन आणि १ रुग्ण ब्राझिलियन व्हेरियंटचा आहे. हे प्रकार अनेक राज्यांतील १०,७८७ पॉझिटिव्ह नमुन्यांच्या तपासणीत आढळले. पंजाबमध्ये ब्रिटन स्ट्रेनचे सर्वाधिक ३३६ रुग्ण आढळले. तेलंगणात १०४, दिल्लीत ६९ व महाराष्ट्रात ६२ रुग्ण आहेत. तेलंगणात दक्षिण आफ्रिकन व्हेरियंटचे सर्वाधिक १७ रुग्ण आहेत. ब्राझील व्हेरियंटचा एकमेव रुग्ण महाराष्ट्रात आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोलचे संचालक डॉ. एस.के. सिंह म्हणाले, वेगाने वाढत्या रुग्णांमागे व्हेरियंट व डबल म्युटंट इतक्या मोठ्या संख्येने नाहीत. दरम्यान, बुधवारी देशात कोरोनाचे ५३,४०६ नवे रुग्ण तर २४९ जणांचा मृत्यू झाला. नव्या रुग्णांचा हा यंदाचा उच्चांक आहे.

व्यक्तीच्या पॉझिटिव्ह नमुन्यात विषाणूंतील दोन प्रकारचे बदल म्हणजेच डबल म्युटंट
डबल म्युटेशन म्हणजे काय, हे घातक आहे?

एकाच्या पॉझिटिव्ह नमुन्यांत दोन प्रकारचे म्युटेशन दिसणे म्हणजेच डबल म्युटेशन. जोवर जनआरोग्यावर परिणाम होत नाही तोवर हे घातक नाही. मात्र, विषाणू तिसऱ्या प्रकारात बदलण्याचा धोका आहेच. म्हणून जीनोम सिक्वेन्सिंग आवश्यक.

नवा स्ट्रेन, प्रकार कोणत्या टप्प्यात आहे?
दुसऱ्या टप्प्यात. कारण जो बदल होतोय तो अनुक्रमात दिसत आहे. आतापर्यंतचे यासंबंधी पुरावे पाहता यामुळे संसर्गाचा वेग वाढल्याचे अजून तरी दिसून आलेले नाही.

नवा स्ट्रेन किंवा प्रकारावर कसे लक्ष ठेवता येईल?
जीनाेम सिक्वेन्सिंगच उपाय आहे. फक्त विदेशातून आलेल्या रुग्णांचे जीनोम सिक्वेन्सिंग करून चालणार नाही. प्रत्येक राज्यात पॉझिटिव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जीनोम सिक्वेन्सिंग व्हावे.

आजवरच्या तपासाचा निष्कर्ष?
ब्रिटन व ब्राझीलच्या स्ट्रेनवर लस गुणकारी आहे. द. आफ्रिकेतील विषाणूवर आणखी अभ्यास हवा.

चिंता... महाराष्ट्रात विषाणू जास्त रूप बदलतोय, इम्युनिटीही प्रभावी नाही
महाराष्ट्रातील नमुन्यांच्या विश्लेषणातून डिसेंबर २०२० च्या तुलनेत व्हायरस अधिक बदलत असल्याचे समोर आले आहे. त्यापासून निर्मित व्हायरसमुळे संसर्ग पसरवत आहेत. यावर रोगप्रतिकार क्षमताही प्रभावी नाही. यामुळे शरीर त्यांच्याशी लढू शकत नाही. बदललेले स्वरूप १५ ते २०% नमुन्यांत आढळले. केरळा N440K व्हेरियंट आढळले. तो यूके, जपान, डेन्मार्क, सिंगापूर आदी १६ देशांमध्येही आढळलाय.

अडचण... जीनोम सिक्वेन्सिंगने गूढ उकलले, ३ व्हेरियंट सर्वात मोठी चिंता
आरोग्य मंत्रालयाने १० नॅशनल लॅबचा एक समूह तयार केला आहे. तो कोरोनाच्या व्हेरियंटची जीनोम सिक्वेन्सिंग आणि त्याच्या फैलावाचे विश्लेषण करत आहे. सर्व नमुने आंतरराष्ट्रीय प्रवास करून आलेले लोक किंवा त्यांच्या संपर्कातील लोकांचे होते. सध्या यूके, द. आफ्रिका व ब्राझीलचे व्हेरियंटच चिंतेचा विषय आहेत. डबल म्युटंटने संसर्ग वाढवल्याचे विश्लेषण केले जात आहे.
भास्कर एक्स्पर्ट, डॉ. आर. गंगाखेडकर, माजी मुख्य शास्त्रज्ञ, आयसीएमआर

बातम्या आणखी आहेत...