आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संसर्ग परतला:गोव्यात 40 दिवसांनंतर कोरोनाचा फेरा; बाजार-किनारपट्ट्या सुनसान

पणजीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र राजधानी पणजीच्या मीरामार किनारपट्टीचे आहे. पणजीतील दोन प्रमुख किनाऱ्यांपैकी एक. लॉकडाऊनच्या सवलतीनंतरही ते सुनसान होते. सामान्य दिवसांत येथे गर्दी असते. - Divya Marathi
छायाचित्र राजधानी पणजीच्या मीरामार किनारपट्टीचे आहे. पणजीतील दोन प्रमुख किनाऱ्यांपैकी एक. लॉकडाऊनच्या सवलतीनंतरही ते सुनसान होते. सामान्य दिवसांत येथे गर्दी असते.
  • एकवेळा कोरोनाला पराभूत केलेल्या राज्यापुढे दुहेरी संकट, संसर्ग परतला; उद्योगही ठप्प
  • राज्यातील ४ हजार हॉटेल, विश्रामगृहे रिकामी; पर्यटकांची पाठ

(मनीषा भल्ला / फ्रेडरिक नाेराेन्हा)

काेराेना विषाणूपासून मुक्त गाेव्यावर पुन्हा एकदा महामारीचे सावट आले आहे. बुधवारी रात्री काेराेनाचे नवे सात रुग्ण आढळून आले आहेत. याआधी गाेव्यात ३ एप्रिलला काेराेनाचा अखेरचा रुग्ण आढळला हाेता. म्हणजेच ४० दिवसांनंतर गाेव्यात पुन्हा काेराेनाचा फेरा दिसून आला आहे.

आधीच सात रुग्णांवर यशस्वी उपचारानंतर १७ एप्रिल राेजी राज्य काेराेनामुक्त घाेषित करण्यात आले हाेते. नव्या रुग्णांपैकी पाच एकाच कुटुंबातील आहेत. लाॅकडाऊनमध्ये सवलत मिळाल्यानंतर हे कुटुंब महाराष्ट्रातून गाेव्यात परतले हाेते. त्याशिवाय आणखी दाेन पाॅझिटिव्ह ट्रकचालकही आहेत.

लाॅकडाऊनदरम्यान परदेशातून आलेले ६ हजार ५०० पर्यटक मायदेशी परतले आहेत. ते पर्यटक जर्मनी, इटली, पाेलंड, सिंगापूर, दक्षिण आफ्रिका व स्वित्झर्लंडचे हाेते. या देशातील सरकारने आपल्या नागरिकांसाठी विशेष विमानांची व्यवस्था केली हाेती. असे असतानाही सुमारे एक हजार परदेशी पर्यटक येथे अडकून पडले आहेत. दुसरीकडे नव्या काेविड नियमांसह गाेव्यातील बाजारपेठ आता खुली झाली आहे. पणजीची बाजारपेठ आता पूर्णपणे सुरू आहे.

राज्याच्या आर्थिक व्यवस्थेला माेठ्या प्रमाणात धक्का बसला आहे. पटरीवर येण्यासाठी गाेव्याला वेळ लागेल. राज्याचा आर्थिक आधार मुख्यत: तीन उद्याेग आहेत. पर्यटन आणि फार्मा. त्यातही काेविड-१९ व लाॅकडाऊनमुळे पर्यटन उद्याेग पूर्णपणे ठप्प आहे. वाहतूक व पर्यटन असाेसिएशनचे उपाध्यक्ष जॅक अजित सुखीजा म्हणाले, लाॅकडाऊनमुळे पर्यटन उद्याेगाला १२०० काेटी रुपयांचा फटका बसला आहे. सर्व हाॅटेल, गेस्ट हाऊस, रेस्तराँ बंद आहेत. गाेव्यात ४ हजार हाॅटेल व गेस्ट हाऊस आहेत. परंतु ते सर्व रिकामे आहेत. आता पावसाचा ऋतू ताेंडावर आहे. त्यामुळे लाॅकडाऊन सुरू झाल्यानंतरही पर्यटन सुरू हाेईल असे वाटत नाही. वास्तविक गाेव्यात ट्रान्सपाेर्ट आॅपरेटर्सला बस चालवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. ट्रान्सपाेर्टर दामाेदर मांदरेकर म्हणाले, माझ्याकडे १४ बस आहेत. परवानादेखील मिळाला आहे. परंतु मी रिक्त बस घेऊन जाणार तरी काेठे ? कारण पर्यटक तर काेठेही दिसत नाहीत. आमच्याकडे भाेपाळ, दिल्ली, हिमाचल प्रदेश व चंदिगडहून ग्रुप येतात. राज्यात टॅक्सीसेवाही सुरू झाली आहे.

गाेव्यात लहान-माेठ्या ४८ किनारपट्टया

गाेव्यात लहान-माेठ्या ४८ किनारपट्ट्या आहेत. उत्तर गाेव्यात वाघा, अंजुना, कलंगुट इत्यादी किनारपट्ट्या एरवी माणसांनी फुललेल्या असतात, परंतु सध्या त्या सुनसान झाल्या आहेत. येथील क्रीडाविषयक घडामाेडीही ठप्प झाल्या आहेत. दक्षिण गाेवा महागडा, परदेशी पर्यटक व पैसेवाल्यांचा मानला जाताे. प्रत्येक किनारपट्टीवर सुमारे १०० रिटेल दुकाने आहेत. सध्या तेही बंद आहेत. गाेव्यात काजू, रासबेरी, नारळ, स्थानिक वाइनची विक्रीही पर्यटकांमुळेच हाेते. तीदेखील बंद आहे. पर्यटन सुरू करण्यासाठी सरकार काेणत्याही प्रकारचा दबाव आणू शकत नाही. कारण रेड झाेनमधील एखादा पर्यटक येथे आल्यास गाेव्याच्या अडचणीत वाढ हाेण्याचीही भीती अाहे, असे व्यावसायिक अजित सुखीजा यांनी वाटते. गाेव्यास एक वर्षात तीन लाख परदेशी व १७ लाख भारतीय पर्यटक भेट देतात. गाेवा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संकल्प अामाेणकर म्हणाले, पुढचा मार्ग नक्कीच नाही. गाेव्याची आर्थिक स्थिती ठीक करण्यासाठी खाण उद्याेगाव्यतिरिक्त सध्या तरी राज्याकडे दुसरा सक्षम पर्याय दिसत नाही. गाेव्याची एकूण लाेकसंख्या १४ लाख आहे. इतर राज्यांच्या तुलनेत ती कमी आहे. लाेकांनी लाॅकडाऊनचेही पालन केले.

रँडम टेस्ट, परदेशी पर्यटकांना ट्रेस करून काेराेनाचा प्रादुर्भाव राेखला

गाेवा काेराेनाच्या विराेधात ठाेस व कठाेर पावले उचलणाऱ्या आघाडीच्या राज्यात गाेव्याचा समावेश हाेताे. लाॅकडाऊन, रँडम सॅम्पलिंग टेस्ट, जनजागृती अभियान, ट्रॅकिंगच्या धाेरणाची भूमिका महत्त्वाची राहिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे गाेव्याने राज्यात तपासणीसाठी प्रयाेगशाळा स्थापन केली. त्याशिवाय परदेशातून येणाऱ्या पर्यटकांना ट्रेस केले. सुरुवातीला सातपैकी सहा बाधित मुंबईहून जहाजाने आले हाेते. या लाेकांचा संपर्क झालेल्या प्रत्येक ठिकाणी रँडम सॅम्पलिंग करण्यात आली. कर्नाटक, महाराष्ट्र व केरळसारख्या हाॅटस्पाॅटने गाेव्याला घेरले आहे. सीमेचा भाग, आैद्याेगिक भागात कियाेस्क स्थापन करण्यात आले आहेत. याद्वारे नमुने गाेळा करणे साेपे हाेणार आहे. घराेघर जाऊन पाहणी करण्यात आली. त्यातून सुमारे ५ हजार नमुने संकलित करण्यात आले. १०० व्हेेंटिलेटरचा सेटअपही हाेता. आता ताे वाढवून ४०० केला.

बातम्या आणखी आहेत...