आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Active Cases Latest Udpates; Mumbai Aurangabad Kolkata Districts | Active Covid Case

कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही:देशातील 90% जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह केस कमी झाल्या, मागील आठवड्यात 70 जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढली

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

देशात दररोज आता 60 हजारांहून कमी कोरोनाची प्रकरणे आढळून येत आहेत. ही एक दिलासादायक बाब आहे की, 650 जिल्ह्यांमध्ये 90% अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे कमी होत आहेत. अ‍ॅक्टिव्ह केस म्हणजे ज्या रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. परंतु अशी 70 जिल्हे आहेत जेथे गेल्या आठवड्यात म्हणजेच 12 ते 19 जून दरम्यान अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये वाढ नोंदवण्यात आली. त्यापैकी फक्त 27 जिल्हे असे आहेत, जिथे अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांची वाढ 100 पेक्षा जास्त होती आणि 10 जिल्ह्यांमध्ये ही वाढ सिंगल डिजिट दिसून आली.

पश्चिम बंगालचे 23 जिल्हे
इंडियन एक्सप्रेसच्या अहवालानुसार, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे वाढणार्‍या 70 जिल्ह्यांपैकी 23 जिल्हे पश्चिम बंगालमधील आहेत. कोलकाता, पूर्व मेदिनीपूर आणि उत्तर 24 परगणा येथे सर्वाधिक केस आढळून येत आहेत. येथे अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांचा आकडा 1.32 लाखांवर पोहोचला होता. मात्र, पुढच्या 20 दिवसांत हा आकडा 15 हजारांवर पोहोचला होता. यानंतर पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. 19 जून रोजी हा आकडा 23 हजारांवर पोहोचला होता. अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांच्या बाबतीत बंगालचा देशात 8 वा क्रमांक आहे.

रिकव्हरी कमी होणे हे एक प्रमुख कारण
बंगालमध्ये अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये वाढ होण्याचे कारण म्हणजे, नवीन प्रकरणांमध्ये वाढ होत नाही. राज्यात नवीन प्रकरणे सातत्याने कमी होत आहेत. आजकाल दररोज सुमारे 3 हजार प्रकरणे येत आहेत, परंतु गेल्या एका आठवड्यात कोरोनामधून सावरणाऱ्यांच्या आकडेवारीत घट झाली आहे. यामुळे अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. उदाहरणार्थ, शनिवारी राज्यात 2486 नवीन प्रकरणे नोंदली गेली आणि केवळ 2100 लोक बरे झाले.

मणिपूर आणि मिझोरममध्येही अ‍ॅक्टिव्ह केसेस वाढल्या आहेत
गेल्या आठवड्यात मणिपूर आणि मिझोरममध्येही अ‍ॅक्टिव्ह प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. परंतु, ही वाढ एक हजाराहूनही कमी होती. दुसरीकडे, महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. यामध्ये मुंबई, पालघर, बुलढाणा, सांगली, औरंगाबाद आणि परभणीचा समावेश आहे. मुंबईत सध्या 21 हजार सक्रिय प्रकरणे आहेत. यामध्ये मागील आठवड्यात 777 रुग्णांची वाढ नोंदवण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...