आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Airborne Virus; COVID Spreads Through Air | ICMR Dr VK Paul On COVID 19 Modes Of Transmission

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परदेशी संशोधनाला केंद्राने मान्य केले:निती आयोगाने म्हटले- कोरोना हवेतून जास्त वेगाने पसरतोय, तर ICMR ने म्हटले- दुसरी लाट कमी धोकादयक

नवी दिल्ली19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तरुणांच्या संक्रमणात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त वाढ नाही

कोरोना हवेतून पसरतो, हे केंद्र सरकारने मान्य केले आहे. निती आयोगाचे सदस्य वीके पॉल यांनी सोमवारी याबाबत सांगितले. परंतू, इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने म्हटले की, कोरोनाची दुसरी लाट आधीपेक्षा कमी धोकादायक आहे.

तरुणांच्या संक्रमणात गेल्यावर्षीच्या तुलनेत जास्त वाढ नाही

वीके पॉल यांनी सांगितले की, मागच्या वर्षी आलेल्या कोरोनाच्या लाटेत जितके संक्रमित झाले, त्यात 30 पेक्षा कमी वय असलेले 31% होते. यंदाच्या लाटेत 32% आहेत. 30 ते 45 वयोगटातील 21% आहेत. मागच्या वर्षीदेखील इतकेच होते. यावरुन असे दिसते की, दुसऱ्या लाटेत तरुणांमधील संसर्ग जास्त वाढत नाहीये.

ICMR चे डीजी बलराम भार्गव यांनी सांगितले की, मागच्या वर्षी आलेली लाट जितकी धोकादयक होती, त्या तुलनेत यंदाची लाट कमी धोकादायक आहे. ICMR आणि निती आयोगाने हे मेडिकल जर्नल लँसेटच्या रिपोर्टच्या हवाल्याने सांगितले आहे. लँसेटने काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, WHO आणि दुसऱ्या आरोग्य संस्थांना या विषाणूचा इतर पद्धतीने सामना करावा लागेल.

बातम्या आणखी आहेत...