आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Cases Decrease In India | Health Ministry Joint Secretary Lav Agarwal On COVID Current Situation; News And Live Updates

कोरोना महामारी:गेल्या आठवड्याच्या तुलनेत नवीन प्रकरणांमध्ये 13% घट, 71 जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी रेट 10 टक्क्यांपेक्षा जास्त

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशातील 34 कोटी लोकांचे लसीकरण

देशात कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमीर होताना दिसत आहे. कारण गेल्या 24 तासांत देशात 46 हजार कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली आहे. तथापि, गेल्या आठवड्याच्या तुलनेत नवीन प्रकरणांमध्ये 13 टक्क्यांनी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. देशातील काही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आलेला आहे. परंतु, देशातील 71 जिल्ह्यांत सध्याही पॉझिटिव्हिटी 10 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे समोर येत आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशात कोरोनाची पहिली लाट 16 सप्टेंबर 2020 मध्ये आली असून त्यावेळी 97 हजार 860 कोरोनाबाधीतांची नोंद करण्यात आली होती. दुसऱ्या लाटेदरम्यान देशात 4 लाख 14 हजार 280 नवीन प्रकरणे आढळले असून यात 3 हजार 923 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. कोरोना महामारीची ही दुसरी लाट 6 मे रोजी आली होती.

देशातील 34 कोटी लोकांचे लसीकरण
देशात गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर सुरुवात झाली आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 34 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात आले आहे. अमेरिकेत आतापर्यंत 32.8 कोटी लोकांना तर ब्रिटनमध्ये 7.79 कोटी लोकांना कोरोनाचे डोस देण्यात आले आहे. देशात आतापर्यंत 80 टक्के आरोग्य कर्मचारी तर 90 टक्के फ्रंटलाईन वकर्संना डोस देण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. देशात 21 जूनपासून सरासरी 50 लाख लोकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

तिसऱ्या लाटेला थांबवणे अवघड
कोरोनाची दुसरी लाट अजूनही पूर्णपणे संपलेली नसून त्यासाठी आवश्यक ते सावधगिरी बाळगण्याचे आवाहन सरकारने केले आहे. त्यासोबतच कोरोनाची तिसरी लाट येईल की नाही हे आपल्या हातात असल्याचे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही के पॉल यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...