आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coronavirus Cases India State Wise LIVE Update; COVID Vaccination Latest News And Live Updates

भारतात कोरोना लसीकरण:6 राज्यांत 18 वर्षांवरील 100% लोकांना मिळाला कोरोना लसीचा पहिला डोस, लसीकरणाचा आकडा 74 कोटी पार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मृत्यू प्रमाणपत्रावर असेल कोरोनामुळे मृत्यूचा उल्लेख

कोरोना लसीकरणात भारत देश दररोज नवनवीन विक्रम करत आहे. देशात रविवारी कोरोना लसीकरणाचा आकडा 74 कोटी पार गेला. विशेष म्हणजे देशातील सहा राज्यांत 18 वर्षांवरील संपूर्ण लोकसंख्येला कोरोना लसीचा पहिला डोस मिळाला आहे. यामध्ये गोवा, हिमाचल प्रदेश, लडाख, सिक्कीम, लक्षद्वीप, दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या राज्यांचा समावेश आहे. देशात सध्या 18 वर्षांवरील लोकांचे लसीकरण सुरु आहे. तर दुसरीकडे, लहान मुलांवरील कोरोना ट्रायल परवानगी देण्यात आली आहे. अशी माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडविया यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.

कोविन पोर्टलवर दिलेल्या आकडेवारीनुसार, देशात रविवारी रात्री 10 वाजेपर्यंत 51.31 कोटी लोकांना लस देण्यात आली आहे. यामुळे देशातील एकूण कोरोना लसीकरणाचा आकडा 74.29 कोटी पार गेला आहे. यापैकी 56.51 कोटींना पहिला डोस तर 17.77 कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. देशात 16 जानेवारीपासून लसीकरणाला सुरुवात झाली आहे. या 8 महिन्यात देशातील 74.29 कोटी लोकांचे लसीकरण झाले आहे.

भारत चीनच्या मागे, अमेरिकेच्या पुढे
कोरोना लसीकरणाच्या आकडेवारीत भारत फक्त चीनच्या मागे आहे. चीनमध्ये आतापर्यंत 2.14 अब्ज लोकांचे लसीकरण झाले आहे. जागतिक लसीकरणाच्या बाबतीत अमेरिका तिसऱ्या क्रमांकावर असून ब्राझील चौथ्या क्रमांकावर आहे. दोन्ही डोस देण्याच्या बाबतीत चीन प्रथम, अमेरिका दुसऱ्या तर भारत तिसऱ्या स्थानावर आहे.

मृत्यू प्रमाणपत्रावर असेल कोरोनामुळे मृत्यूचा उल्लेख
मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्या रुग्णांची आरटी-पीसीआर चाचणी, आण्विक चाचणी, रॅपिड-अँटीजन चाचणी किंवा डॉक्टरांनी रुग्णालय किंवा घरी तपासणी केल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह ठरवले आहे. अशाच लोकांच्या मृत्यू् प्रमाणपत्रावर याची नोंद केली जाणार आहे. विषबाधा, आत्महत्या, हत्या किंवा अपघातासह इतर कारणांमुळे होणारे मृत्यू हे कोरोनाशी संबंधित मृत्यू मानले जाणार नाहीत. ती व्यक्ती कोरोना संक्रमित असल्यावर ही हे मान्य केले जाणार नाही असे मार्गदर्शक तत्वांत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...